भोईसर-तारापूर एमआयडीसीत केमिकल कंपनीत स्फोट; तीन कामगारांचा मृत्यू

0

पालघर : पालघर येथील भोईसर-तारापूर एमआयडीसीत केमिकल कंपनीत स्फोट झाल्याची गंभीर घटना घडली. या दुर्घटनेत तीन कामगारांचा मृत्यू झाला असून सुमारे दहापेक्षा अधिक कामगार जखमी झाले आहेत.

गोपाल गुलजारीलाल सिशोदिया (35), पंकज यादव (32), सिकंदर (27) अशी मृत कामगारांची नावे आहेत. तारापूर औद्योगिक वसाहतीमधील भगेरिया इंडस्ट्रीज लिमिटेड या कंपनीत तापमान वाढल्याने हा स्फोट झाल्याचे प्राथमिक कारण समोर आले आहे. कंपनीत गामा एसिड उत्पादनाची रासायनिक प्रक्रिया सुरू असताना तापमान वाढल्याने हा स्फोट झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

दुर्घटनाग्रस्त केमिकल कंपनीत उत्पादन सुरू असताना स्फोट झाला. या स्फोटात जखमी झालेल्या कामकारांना लगतच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. स्फोटाची भीषणता एवढी होती की, आसपासचा परिसराला धक्के बसले.

स्फोटानंतर घटनास्थळी गॅस गळती सुरू असून त्यामुळे तेथे जाण्यास सर्वांनाच मनाई करण्यात आली. या घटनेनंतर आग्निशामक दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. स्फोटाचे कारण अद्याप समोर आले नाही. 

Leave A Reply

Your email address will not be published.