तुर्की : तुर्कीतील सर्वात मोठं शहर असलेल्या इस्तंबुल आज बॉम्बस्फोटाच्या धमाक्यानं हादरलं. इस्तंबुलमधील तक्सिम चौकात हा स्फोट झाला असून त्यामध्ये आतापर्यंत सहा जणांचा मृत्यू झाला असून 80 हुन अधिक लोक गंभीर जखमी असल्याची माहिती आहे.
तुर्कीच्या इस्तंबूलमध्ये रविवारी म्हणजेच 13 नोव्हेंबरला झालेल्या बॉम्बस्फोटात 6 जणांचा मृत्यू झाला होता. तर 81 जण जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. पोलिसांनी सांगितले की, रविवारी सायंकाळी 4.15 वाजेच्या सुमारास गर्दी असलेल्या व जेथे रस्ता अरूंद होता. अशा ठिकाणी हा स्फोट झाला आहे. हा स्फोट महिलेने घडवून आणल्याचा दावा मीडिया रिपोर्ट्समध्ये केला जात आहे.
अल जजीरा ने सुत्रांचा हवाला देत आपल्या अहवालात म्हटले आहे की, या हल्ल्यात 3 लोकांचा समावेश आहेत. त्यात एक महिला आणि दोन तरूणांचा समावेश आहे. रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, एक महिला सुमारे 40 मिनिटे रस्त्यावर ठेवलेल्या बेंचवर बसली. यानंतर ती गर्दीच्या ठिकाणी बॅग टाकून बाहेर निघून गेली. काही मिनिटांनी स्फोट झाला. या बॅंगेत तिने बॉम्ब ठेवला होता.