मुंबई : कर्नाटक सीमा प्रश्नावर मार्ग काढला पाहिजेत. केंद्रात भाजपची व राज्यात शिवसेना-भाजपची सत्ता आहे. कर्नाटकातही भाजपची सत्ता आहे. लवकरात लवकर यावर तोडगाव निघेल असे वाटते. राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्या वक्तव्याला महाराष्ट्राने साथ दिली पाहिजेत. नेत्यांनाही महाराष्ट्रातील लोकांनी साथ दिली पाहिजेत.
कर्नाटकातील लोक एकत्र येवू शकतात तर महाराष्ट्रानेही पक्षभेद विसरुन महाराष्ट्र एकसंघ असल्याचे दाखवले पाहिजेत, अशी अपेक्षा पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केली.
कर्नाटक सीमा प्रश्न न मिटल्यास कर्नाटकला जाण्यासंदर्भात राष्ट्रवादीचे नेते शरद पवारांनी केलेल्या वक्तव्यासंदर्भात पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला मंत्री पाटील उत्तर देत होते.
मी खूप पॉवरफूल आहे. त्यामुळे दोन मंत्र्यांना, खासदारांना दूध संघाच्या निवडणुकीत मतदारांच्या दारावर फिरावे लागत असल्याचे आमदार एकनाथ खडसे म्हणतात. मागच्या वेळेसही ते पॉवरफूल होते.
गिरीश महाजनांसह ते स्वत: मंत्री होते. मंत्री पॉवरफूलच असतो. ते आमचे नेते आहेत.त्यांना आम्ही नेताच मानतो. निवडणुकीपुरत्या गोष्टी सोडल्या तर एकनाथ खडसंेसारखा ग्रेट नेता नाही. त्यांना नेता अमान्य करतच नाही, असे मंत्री पाटील म्हणाले.