विशाखापट्टणम येथून आणलेला ५३ लाखांचा गांजा ‘फिल्मी स्टाईल’ने जप्त

आमली पदार्थ विरोधी पथकाची मोठी कामगिरी

0

पिंपरी : विशाखापट्टणम येथून आलेल्या गांजाची शहरात विक्री करणाऱ्या टोळीला ‘फिल्मी स्टाईल’ अटक करण्यात आलेली आहे. पिंपरी चिंचवडच्या आमली पदार्थ विरोधी पथकाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी जीवाची बाजी लावत धडाकेबाज कारवाई केली आहे. ५२ लाख ७२ हजार ८०० रुपये किंमतीचा २१० किलो ९१२ ग्रॅम वजनाचा गांजासह ५९ लाख रुपयांचा ऐवज जप्त केला आहे.

गणेश कैलास चव्हाण (२५, रा . तलाठी ऑफीस जवळ , पाटेठाण , पो . राहु ता . दौड जि.पुणे ( वाहन चालक )), विकास विलास चव्हाण (२० , रा . मु.चिंचोलवाडी पो . गोरेगांव ता . मानगांव जि . रायगड), संजय रामदास पवार  (२७, रा . खेडले झुंगे ता . निफाड जि . नाशिक, ह.मु. पो . तलाठी ऑफीस जवळ , पाटेठाण . पो . राहु ता . दौड जि.पुणे), गणेश महेश जगनाडे (रा . भालसिंगवाडी ता . खेड . जि . पुणे), राणी महेश जगनाडे आणि सचिन गणपत आवळे यांना अटक केली आहे.

अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्यांची माहिती तीन वेगवेगळी पथकाद्वारे सुरु होती. चाकण पोलीस स्टेशन हद्दीमध्ये पेट्रोलींग करीत असताना पोलीस अंमलदार संदिप पाटील, प्रदिप शेलार व अशोक गारगोटे यांना माहिती मिळाली की, एक मारुती सुझुकी कंपनीच्या (एमएच ४३, व्ही ३७८८) गाडीमधुन गांजा विक्री करण्याकरीता भालसिंगवाडी येथे येणार आहे. पोलीस पथक भालसिंगवाडी कडून चाकण – वांद्रे रोडकडे जात असताना सदरची संशयीत गाडी येतांना दिसली.

थांबण्याचा इशारा केला असता गाडी ड्रायव्हरने सुरवातीला थांबवून नंतर गाडीसमोर जात असलेले पोलीस अंमलदार संदिप पाटील यांचे अंगावर गाडी घालुन जिवे मारण्याचा प्रयत्न करून पळुन जाण्याचा प्रयत्न केला. मात्र पुढे रस्ता कच्चा व अरुंद असल्याने आणि समोर पोलीस गाडी उभी असल्याने ड्रायव्हर फसला.

त्याचवेळी पोलीस अंमलदार अशोक गारगोटे यांनी लगेच चलाखीने ड्रायव्हर बाजुचा दरवाजा उघडुन गाडीची चावी काढुन घेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी ड्रायव्हरने गाड़ी रिव्हर्स मध्ये घालुन रत्याचे कडेला असलेल्या सिमेटचे खांबाला धडकवली. गाडी खडयामध्ये पलटी झाली. गाडीचा ड्रायव्हर पळ काढत असताना पाठलाग करुन ताब्यात घेतले .

गाडीची झडती घेतली असता डीकीमध्ये गांजाचे१२ मोठे पुडे, पाकिटे व ४० लहान पुडे, पाकिट मिळाले. अधिक चौकशी केली असता हे सर्व गणेश जगनाडे, राणी जगनाडे व सचिन आवळे यांचे सांगणेवरुन विशाखापट्टणम येथून आणला असल्याचे समोर आले.

ही कामगिरी पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, अप्पर पोलीस आयुक्त संजय शिंदे, उपायुक्त काकासाहेब डोळे, सहायक आयुक्त प्रशांत अमृतकर यांच्या मार्गदर्शनाखाली आमली पदार्थ विरोधी पथकाचे निरीक्षक सतीश पवार, सहायक निरीक्षक प्रशांत महाले, उपनिरीक्षक राजन महाडिक, अंमलदार बाळासाहेब सूर्यवंशी, जिलानी मोमीन, प्रदीप शेलार, राजेंद्र बांबळे, संतोष दिघे, संदीप पाटील, मनोज राठोड, अनिता यादव, प्रसाद कलाटे, विजय दौडकर, प्रसाद जगलीवाड, अशोक गारगोटे, पांडुरंग फुंदे, राजेंद्र शेटे, नागेश माळी, पोपट हुलगे या पथकाने केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.