नाशिकच्या कांदा व्यापाऱ्याकडे सापडली 26 कोटी रुपयांची रोकड

0

नाशिक : आयकर विभागाने नाशिकमधील दहाहून अधिक कांदा व्यापाऱ्यांवर गेल्या चार दिवसांपासून धाडसत्र सुरु केलं आहे. यामध्येकोट्यवधी रुपयांची रोकड आणि बेहिशोबी मालमत्ता जप्त करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. आयकर विभागाच्या धाडीचेकाही फोटो जाहीर करण्यात आले असून त्यामध्ये नोटांची थप्पीच्या थप्पी दिसत आहे

आयकर विभागाने जप्त केलेली ही मालमत्ता कोट्यवधींची असून त्याचा कोणताही हिशोब या व्यापाऱ्यांकडे नसल्याची माहिती सूत्रांनीदिली आहे. या व्यापाराच्या घरांवर, कार्यालयांवर धाडी टाकण्यात आल्या असून त्यांच्या बँक अकाऊंटचीही माहिती घेण्यात येत आहे. यामुळे पिंपळगाव तसेच नाशिक परिसरात एकच खळबळ उडाली असल्याचं चित्र आहे

आयकराने जप्त केलेल्या या मालमत्तेचं पुढं काय केलं जाणार, या व्यापाऱ्यावर पुढे कोणती कारवाई करण्यात येणार तसेच याव्यापाऱ्यांचे नाव जाहीर करण्यात येणार का असे अनेक प्रश्न आहेत. अद्याप आयकर विभागाकडून यावर कोणतीही अधिकृत प्रतिक्रियादेण्यात आली नाही

Leave A Reply

Your email address will not be published.