अहमदनगर : राज्यात ज्या ज्या विभागात परीक्षेत घोटाळे झाले त्या घोटाळ्यात त्या त्या मंत्र्यांचा आणि मुख्यमंत्र्याचा हात असल्याचा आरोप केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केला आहे.
राज्यात पुणे पोलीस सध्या म्हाडा भरती, टीईटी परीक्षा, आरोग्य भरती प्रक्रिया या परीक्षेतील भ्रष्टाचाराच्या प्रकरणांचा तपास करत आहेत.
परिणामी राज्य सरकारला टीकेला तोंड द्यावं लागत आहे. राज्यात सध्या पदभरती घोटाळ्यावरून जोरदार राजकारण पेटलं आहे. महाविकास आघाडीवर भाजपकडून जोरदार टीका करण्यात येत आहे.
अशात आता केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली आहे. राज्यातील परीक्षा घोटाळ्यात त्या त्या खात्याचे मंत्रीच जबाबदार असून राज्याचा मुखीया देखील परीक्षा घोटाळ्याला जबाबदार असल्याचा आरोप दानवे यांनी केला.
आपले राज्य मुख्यमंत्र्यांविना सुरू असून राज्य फक्त जनतेच्या भरवशावर सुरू असल्याची टीका राज्य सरकारवर दानवे यांनी केली आहे.
राज्यात काही दिवसांपूर्वी मोठा पदभरती घोटाळा उघडकीस आला होता. परिणमी सरकारला यावरून मोठ्या टीकेचा सामना करावा लागला होता. त्यांनतर आता या घोटाळ्याचा तपास चालू आहे.