मुलाचे अपहरण; 100 ‘बिट क्वाईन’ची मागणी

0

उजिरे : उद्योजक आणि सेवानिवृत्त लष्कर अधिकाऱ्याच्या मुलाचे अपहरण करण्यात आले. आरोपीनी मुलाच्या सुटकेसाठी 100 ‘बिट क्वाईन’ची मागणी केली. पोलिसांनी सापळा रचून अपहरणकर्त्यांना अटक केली. सध्याच्या दरानुसार बिटकॉईनची किंमत जवळपास 17 कोटी रुपये होते.

पोलिस अधीक्षक लक्ष्मीप्रसाद यांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणात अटक करण्यात आलेला आरोपी हा अपहरणकर्त्या मुलाच्या वडिलांचा जुना बिझनेस पार्टनर आहे. बिटकॉईनचा दर वाढल्यानंतर आरोपीने पैसा उकळण्याच्या हेतून आपल्या पूर्वीच्या बिझनेस पार्टनरच्या मुलाचे अपहरण केले.

पोलिसांकडे तक्रार दाखल झाल्यानंतर दक्षिण कन्नड़ पोलीस अधीक्षक बीएम लक्ष्मी प्रसाद यांनी विशेष तपास पथकाची नियुक्ती केली होती. आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांनी चारमडी घाट जंगल परिसरात नाकाबंदी केली होती. तेथून आरोपींना अटक करण्यात आलेली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.