3 लाखाच्या लाच प्रकरणी नवी मुंबई महापालिकेतील लिपिक अँटी करप्शनच्या जाळ्यात

0

मुंबई : सेस करावरील दंडाची रक्कम निरंक दाखवण्यासाठी नवी मुंबई महापालिकाच्या कोपरखैरणे वार्डातील सेस एलबीटी स्थानिक संस्था कर विभागातील कंत्राटी लिपीकाने 3 लाखाची लाच मागितली. त्यापैकी 1 लाख रुपये लाच घेतना मुंबई लाच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लिपिकाला रंगेहाथ पकडले. ही कारवाई नवी मुंबई येथील बिकानेर स्वीट मार्ट समोर दिवाळे गाव सीबीडी बेलापुर येथे सोमवारी दुपारी पावणे दोनच्या सुमारास केली.

विनायक हरिश्‍चंद्र पाटील (33) असे लाच घेताना रंगेहात पकडण्यात आलेल्या लिपीकाचे नाव आहे. याप्रकरणी 36 वर्षाच्या तक्रारदाराने मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांची खैरणे एमआयडीसी मध्ये खाजगी कंपनी आहे. तक्रारदार यांनी त्यांचे खाजगी कंपनीस सन 2013 ते 2016 या कालावधीत आलेला सेस कर नवी मुंबई महानगरपालिका कार्यालयात सन 2019 मध्ये भरला आहे. सन 2013 ते सन 2016 या कालावधीतील सेस कर वेळेत न भरल्यामुळे त्यावर दंडाची रक्कम व व्याजाची रक्कम कोपरखैरणे सेस /एलबीटी विभागातील कार्यालयीन संगणकामध्ये निरंक दाखविण्यासाठी विनायक पाटील यांनी 3 लाख रुपये लाच मागितली. तक्रारदार यांना लाच देणे मान्य नसल्याने त्यांनी सोमवारी (दि.8)नवी मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयात तक्रार दाखल केली.

तक्रारदार यांनी तक्रार दाखल केल्यानंतर पथकाने शासकीय पंचांसमक्ष लाचेच्या मागणीची सत्यता पडताळणी केली. त्यावेळी तक्रारदार यांच्या कंपनीचे नावे असलेली कराची दंडाची व व्याजाची रक्कम निरंक दाखविण्यासाठी विनायक पाटील यांनी 3 लाख रुपये लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. तसेच लाचेच्या रकमेतील 1 लाख रुपयांचा पहिला हप्ता स्वीकारण्याचे कबूल केले. तसेच लाचेची रक्कम बिकानेर स्वीट मार्ट समोर दिवाळे गाव सीबीडी बेलापुर येथे स्विकारण्याचे कबुल केले.
त्यानंतर काही वेळाने नवी मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने बिकानेर स्वीट मार्ट समोर दिवाळे गाव सीबीडी बेलापुर नवी मुंबई येथे सापळा रचला.विनायक पाटील याने तक्रारदार यांच्याकडून गाडीमध्ये एक लाख रुपये घेतले. पैसे स्विकारल्यानंतर पथकाने पाटील यांनी रंगेहाथ पकडले.

ही कारवाई ठाणे परिक्षेत्र पोलिस अधीक्षक पंजाबराव उगले
ठाणे परिक्षेत्र अपर पोलीस अधीक्षक अनिल घेरडीकर
यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक ज्योती देशमुख,
पोलीस हवालदार जाधव, पवार, ताम्हणेकर, पोलीस नाईक पांचाळ, माने, चालक पोलीस हवालदार गायकवाड यांच्या पथकाने केली.

Leave A Reply

Your email address will not be published.