सिन्नर मध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस; अनेकजण बेपत्ता

0

नाशिक : नाशिकच्या सिन्नर तालुक्यात पावसाने अक्षरशः हाहाकार माजवला आहे. ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याने तालुक्यातील अनेक रस्ते पाण्याखाली गेले आहेत. तर, नदीकाठच्या अनेक वाड्या-वस्त्यांमध्ये पाणी शिरल्याने मोठं नुकसान झालं आहे

यात काही नागरिक बेपत्ता असल्याचीही माहिती समोर येत आहे. अशात आता सिन्नरमधील नागरिकांचं रेस्क्यू करतानाचा व्हिडिओ समोर आला आहे. रात्रीपासूनच घटनास्थळावर मदतकार्य करण्यासाठी शासकीय यंत्रणा दाखल झाल्या आहेत.

सध्या समोर आलेल्या व्हिडिओमध्ये जेसीबीच्या सहाय्याने नागरिकांचं रेस्क्यू केल्याचं पाहायला मिळतं. यात अनेक नागरिक जेसीबीवर बसलेले पाहायला मिळतात. नागरिकांना घेऊन हा जेसीबी पुराच्या पाण्यातून बाहेर पडताना दिसत आहे. JCB वर बसवून 33 नागरिकांची सुटका करण्यात आलेली आहे.

दरम्यान नाशिकमध्ये मंगळवारी दुपारी अचानक झालेल्या पावसानेही वाहनचालकांची चांगलीच धावपळ उडाली. शहारातील प्रमुख रस्त्यावर गुडघाभर पाणी साचले होते. या पाण्यामधून मार्ग काढण्याची कसरत काही वाहनचालक करत होते. शहरातील प्रत्येक रस्त्यावर पाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचलं होत,विजेच्या कडकडाटासह पावसाने जोरदार हजेरी लावली.

मुंबईनाका, शालिमार, सीबीएस, जुने नाशिक, रामकुंड, राणे नगर, पंचवटी भागात अवघ्या 15 मिनिटं झालेल्या पावसात रस्ते पाण्याखाली गेले होते.

महिनाभरापूर्वी नाशिकच्या सप्तशृंगी गडावर ढगफुटी सदृश पाऊस झाला होता. गडावर पाणी साचल्यानं पायऱ्यांना धबधब्याचं स्वरूप प्राप्त झालं होतं. यावेळीही पायऱ्यांवर पाण्यासोबतच चिखल, दगड वाहून येत असल्यानं भाविकांना फटका बसला होता. गड चढताना काही भाविक जखमीही झाले होते. यानंतर प्रशासनाचं विशेष पथक गडावर तैनात करण्यात आलं होतं.

Leave A Reply

Your email address will not be published.