कोल्ड ब्लडेड मर्डर; मित्राच्या मदतीने केले प्रियशीचे तुकडे

0

औरंगाबाद : जिल्ह्यातील शिवूर आणि पंचक्रोशित नावाजलेल्या सौरभ लाखेने आपण विवाहित आहोत याचे भान न ठेवता, दुसऱ्या विवाहितेसोबत प्रेमसुत जुळवले. अधूनमधून तो तिला भेटायचा, पण प्रेयसीच्या घरोबा करण्याचा हट्टानेच तिचा जीव गेला. डोक्यावरुन पाणी जात असल्याने तोही वैतागला अन् तिला मारण्यासाठी त्याने थंड डोक्याने प्लॅन रचला. यासाठी सौरभने तीन साथीदारांनाही हाताशी धरले.

तरुणीच्या शरिराच्‍या खांडोळ्या करुन विल्हेवाट लावण्‍याचा प्रयत्‍न केल्याप्रकरणी मुख्य संशयित सौरभ बंडु लाखे (31) याच्यासह सहआरोपी म्हणून सुनील गंगाधर धनेश्वर (25, दोघे रा. शिऊर ता. वैजापुर), मन्‍वर उस्‍मान शहा (रा. शिऊर ता. वैजापुर) यांच्यावर खुनाचा गुन्हा नोंदवण्यात आला. यात सौरभ आणि सुनील यांना अटक झाली. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेत चौकशी केली तेव्हा त्यांच्याकडून खुनाचा घटनाक्रमच उलगडला.

अंकिता श्रीवास्तव या तरुणीसोबत सौरभचे प्रेम जुळले. हि बाब सासरी, माहेरी कुटुंबियांना समजल्यानंतर पतीला सोडून ती राहु लागली. तिने औरंगाबादेतील हडकोत एक खोली भाड्याने घेत स्पर्धा परीक्षेची तयारी सुरु केली. सौरभ आणि अंकिता एकमेकांना भेटत होते, पण लग्न करावे म्हणून ती खूपच मागे लागल्याने सौरभ हतबल झाला. त्याचाही विवाह झाला असल्याने त्याची मोठी अडचण झाली होती, म्हणून त्याने अंकिताचा काटा काढण्यासाठी थंड डोक्याने आधी प्लॅन रचल्याचे समोर आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.