उपमुख्यमंत्री पद काँग्रेसच्या वाट्याला ?, नितीन राऊत यांची वर्णी ?

0
नवी दिल्ली : महाविकास आघाडीच्या सरकारमधील काँग्रेसकडील खात्यांमध्ये फेरबदलाचे संकेत आहेत. उपमुख्यमंत्री पद काँग्रेसच्या वाट्याला येण्याची शक्यता असून नितीन राऊत यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे. तर नितीन राऊतांचं खातं पटोलेंकडे जाण्याची शक्यता आहे.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि मंत्री नितीन राऊत यांनी आज सोनिया गांधी यांची भेट घेतलीय. या भेटीमुळे मंत्रीमंडळ विस्ताराच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. नाना पटोले यांना नितीन राऊत यांचं खातं दिलं जावू शकतं. आक्रमक आणि काँग्रेसमधील दलित चेहरा असलेले नितीन राऊत यांना उपमुख्यमंत्रिपद मिळू शकतं.

महाविकासआघाडी सरकारमध्ये काही बदल होण्याची शक्यता आहे. विधानसभा अध्यक्षपद शिवसेना स्वत:कडे ठेवून काँग्रेसला उपमुख्यमंत्रीपद मिळण्याची शक्यता आहे. नाना पटोले यांच्या राजीनाम्यानंतर विधानसभा अध्यक्षपद शिवसेनेला ऑफर करण्यात आलं. त्यासाठी काँग्रेसने शिवसेनेला ऑफर केल्याची माहिती आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.