बांधकाम व्यवसायिक संग्राम पाटील यांचा ‘दुबई’च्या मानाच्या पुरस्काराने सन्मान

0

मुंबई : दुबई येथे पार पाडलेल्या “MAHA EMIRATES AWARDS 2023” या भव्य पुरस्कार सोहळ्यामध्ये नवी मुंबईच्या बिल्डर्सलॉबी मधील एक विश्वसनीय नाव असणारे आणि तेजस बिल्डर्स आणि डेव्हलपर्सचे मॅनेजिंग डायरेक्टर संग्राम पाटील यांना

“GREATEST LEADER IN REAL ESTATE OF THE YEAR” या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

यावेळी दुबईमधील विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.

सदरचा पुरस्कार स्वीकारताना संग्राम पाटील यांनी भारत आणि दुबई यांचे नातेसंबंध किती दृढ आहे याचा उल्लेख आवर्जून केला. त्याचप्रमाणे भारतात सर्व ठिकाणी मोठ्या प्रमाणात प्रगतीची कामे जोरात चालू आहे. त्यातच नवी मुंबईत आंतरराष्ट्रीय विमानतळ, न्हावाशेवा सिलिंक, जेएनपीटी यासारख्या विविध विकासाचा भरणा सध्या नवी मुंबईत होत आहे. नवी मुंबईतील विकासाचा आढावाहा जोमाने पुढे सरकत आहे. यासाठी नवी मुंबईत आपण पण सर्वांनी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करावी, असे आवाहन संग्राम पाटीलयांनी केले.

मराठी माणसाचा परत एकदा अटकेपार झेंडा यावेळी दिसून आला. सदरच्या पुरस्काराचे सर्व श्रेय संग्राम पाटील यांनी त्यांचे कुटुंब, त्यांचा सर्व स्टाफ आणि त्यांचे सर्व मित्र परिवार यांना समर्पित केला आहे. आज नवी मुंबईचं नांव दुबईमध्ये गाजल्यामुळे सर्व रिअलइस्टेट क्षेत्रात त्यांच्यावर कौतुकाची थाप पडताना दिसून येत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.