मराठा आरक्षणावरून वादग्रस्त वक्तव्य

राज्याचे आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांची जीभ घसरली

0

बीड : सत्तांतर होताच मराठा आरक्षणाच्या विषयाची खाज का?, असे वादग्रस्त वक्तव्य राज्याचे आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी केलेआहे. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी शिंदेफडणवीस सरकार कटिबद्ध आहे. मात्र, गेली 2 वर्षे हे सर्व जण शांत होते, असेतानाजी सावंत यांनी उस्मानाबादमध्ये जाहीर सभेत म्हटले आहे.

तानाजी सावंत म्हणाले, 2014 ते 2019 या काळात ज्या देवेंद्र फडणवीसांवर मराठा आरक्षणावरुन टीका करण्यात आली. त्यांच देवेंद्रफडणीस यांनीच मराठा आरक्षणाचा विषय मार्गी लावला होता. 2019 च्या नंतर सत्तेत दगाबाजी करत राष्ट्रवादी काँग्रेसने उद्धव ठाकरेयांना मुख्यमंत्री केलं. त्यावेळी मराठा आरक्षणाचा विषय अक्षरशः बाजूला पडला होता, ​​असा आरोप तानाजी सावंत यांनी केला आहे. उस्मानाबादमध्ये हिंदुत्वगर्जना कार्यक्रमात ते बोलत होते.

सत्तांतर झाल्यावरच विरोधकांना मराठा आरक्षणाची खाज सुटली असे वादग्रस्त तानाजी सावंत यांनी केले आहे. सावंत म्हमाले, यांनाआरक्षण पाहिजे. आता म्हणतात ओबीसी मधून पाहिजे. उद्या म्हणतील एससीमधून पाहिजे. याचा सगळा करता करविता कोण हेसगळ्यांना चांगल माहीत आहे. पण, मराठा आरक्षणाचा विषय अत्ताच काढून वातावरण खराब करणाऱ्यांना ओळखलं पाहिजे. आरक्षणावरून राष्ट्रवादीने दुटप्पी भूमिका घेतल्याचे सांगत त्यांनी राष्ट्रवादीवर निशाणा साधला आहे.

तानाजी सावंत हे नेहमी चर्चेत असतात. कधी त्यांचे व्यक्तव्ये तर दौरा हा चर्चेचा विषय ठरताना दिसून येतो. शनिवारीच तानाजी सावंतयांनी धनंजय मुंडेंवर जोरदार टीका केली होती. मुख्यमंत्र्यांवर टीका केली तर बीडमध्ये नागडे केल्याशिवाय राहणार नाही, असा टोलात्यांनी लगावला होता.

शनिवारीही माझ्याकडून साहित्यिक बोलण्याची अपेक्षा करू नका, मुख्यमंत्र्यावर टीका कराल तर बीडमध्ये येऊन नागडे केल्याशिवायराहणार नाही अशी टीका आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी धनंजय मुंडे यांचे नाव घेता त्यांच्यावर केली होती.

Leave A Reply

Your email address will not be published.