नवी दिल्ली : कोरोना व्हायरसने संपूर्ण जगाला विळखा घातला आहे. हाच व्हायरस आपलं रुप दिवसेंदिवस बदलत आहे. यापूर्वी सर्दी, खोकला आणि ताप यांसारखी सामान्य लक्षणे जरी असली तरी कोरोनाची भीती होती. मात्र, आता आणखी दोन लक्षणे कोरोनाची असल्याचे डॉक्टरांनी केलेल्या अभ्यासातून समोर आले आहे.
कोरोनाबाधित असलेल्या व्यक्तीचे डोळे आणि कान या अवयवांवर कोरोना व्हायरस हल्ला करत आहे. कोरोनाच्या या नव्या स्ट्रेनमध्ये व्हायरल ताप, पोटदुखी, डायरिया, अपचन, गॅस, उल्टी, भूक न लागणे, अंगदुखी आणि ऍसिडिटीसारखी लक्षणे दिसत आहेत. मात्र, आता आणखी नवीन लक्षणे समोर आली आहेत. एसजीपीजीआय आणि केजीएमयूसह अनेक कोविड रुग्णालयात दाखल झालेल्या कोरोनाबाधित रुग्णांमध्ये ऐकणे आणि दिसण्यात अडचणी येत आहेत. काही रुग्ण असेही आहेत त्यांना दोन्ही कानांनी ऐकू येत नाही. याशिवाय त्यांना दिसण्यातही अडचण येत आहे. गंभीर स्थिती झाल्यानंतर कोरोना व्हायरस शरीरातील अवयवांवर परिणाम करतो.
तसेच त्यांनी पुढे सांगितले, की कोरोना व्हायरसने ज्याप्रकारे रुप बदलले त्यानंतर चिंतेत वाढ झाली आहे. कोरोनाच्या नियमावलीचे पालन करणे हाच आता एकमात्र उपाय शिल्लक आहे. मात्र, चांगली इम्युनिटी पॉवर असलेल्या लोकांवर कोरोना व्हायरस जास्तवेळ प्रभाव टाकू शकत नाही. असे रुग्ण 5-6 दिवसांत ठिक होतात.