डबल म्युटंट व्हेरिएंटमध्ये आणखी एक म्युटेशन झाल्यानं त्याचं रुपांतर ट्रिपल म्युटंटमध्ये झाल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाला देण्यात आली होती.
डबल म्युटंट व्हेरिएंटच्या स्पाईक प्रोटिनमध्ये तिसरं म्युटेशन झालं आहे. महाराष्ट्र, दिल्ली, पश्चिम बंगाल, छत्तीसगडमधून घेण्यात आलेल्या नमुन्यांमध्ये नवं म्युटेशन दिसून आलं आहे. सध्या या राज्यांमध्ये कोरोनाची दुसरी लाट आली असून कोरोना रुग्णांची संख्या झपाट्यानं वाढत आहे.
नॅशनल सेंटर फॉर डिजीज कंट्रोलनं (NCDC) काही महिन्यांपूर्वीच डबल म्युटंट व्हेरिएंटची माहिती दिली होती. या व्हेरिएंटला शास्त्रज्ञांनी B.1.167 नाव दिलं होतं. यामध्ये दोन प्रकारचे (E484Q आणि L452R) म्युटेशन्स आहेत. हा कोरोनाचा असा विषाणू आहे, ज्यामध्ये दोनवेळा बदल झाला आहे. विषाणू स्वत:ला दीर्घकाळ प्रभावी ठेवण्यासाठी सातत्यानं स्वत:च्या रचनेत बदल करतो.
स्वत:चा बचाव करण्यासाठी विषाणू परिस्थितीनुसार स्वत:मध्ये बदल घडवून आणतो. त्यालाच म्युटेशन असं म्हटलं जातं. कोरोना विषाणूचा दुसरा म्युटंट व्हेरिएंट धोकादायक मानला जात होता. त्यात आता ट्रिपल म्युटंट आढळून आल्याच्या शक्यतेनं चिंतेत भर पडली आहे. पहिल्या टप्प्यात 15 दिवसांचा ‘कडक’ लॉकडाऊन गरजेचा, कॅबिनेटमध्ये चर्चा
B.1.618 – a new lineage of SARS-CoV-2 predominnatly found in India and characterized by a distinct set of genetic variants including E484K , a major immune escape variant. pic.twitter.com/dtfQJp2S2B
— Vinod Scaria (@vinodscaria) April 20, 2021