भोर : अवैधरित्या गुटखा साठा करत विक्री करत असल्या प्रकरणी अन्न औषध प्रशासनाने कारवाई केली असुन या गुन्ह्या प्रकरणी दुकान मालकास अटक करण्यात येऊन दुकान बंद करण्यात आले आहे. संशियत आरोपीची न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली असून परिसरात मोठे धेंडे यांच्यावर सुद्धा कारवाई करण्याची मागणी होत आहे.
नसरापूर ( ता. भोर ) येथे महामार्गालगत चेलाडी फाटा येथे संजय प्रोव्हीजन स्टोअर्स येथे कारवाई करण्यात आली असून याप्रकरणी राजगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असुन अवैधरित्या एकुण १५८७ रुपयांचा गुटख्याचा साठा करुन विक्री करत असल्या प्रकरणी संजय प्रोव्हीजन स्टोअर्सचे मालक श्रीकांत पांडुरंग गोळे वय ६२ रा. करंदी ता.भोर यांना अटक करण्यात आली आहे. याबाबत अन्न औषध प्रशासनाच्या अन्न सुरक्षा अधिकारी स्वाती म्हस्के यांनी राजगड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
अन्न औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त दिलीप संगत यांनी या कारवाईत सहभाग घेतला त्यांनी दिलेल्या माहीतीनुसार त्यांना मिळालेल्या गुप्त माहीतीनुसार नसरापूर येथील संजय प्रोव्हीजन स्टोअर्समध्ये अवैधरित्या गुटखा विक्री होत असल्याचे समजले. त्यानुसार संगत व सुरक्षा अधिकारी स्वाती म्हस्के यांनी दुकानावर प्रत्यक्ष जावुन पाहणी केली असता दुकानदार गोळे हे शासनाने बंदी घातलेला गुटखा विक्री करत असल्याचे निदर्शनास आले.
त्यामुळे त्यांच्यावर अन्न सुरक्षा कायद्यान्वये प्रतिबंधीत अन्न पदार्थ साठा व विक्री केल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली व दुकाना मधुन एकुण १५८७ रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला. याप्रकरणी राजगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असुन श्रीकांत गोळे यांना अटक केल्या नंतर आज न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने गोळे यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली असून पुढील तपास पोलिस हवालदार पी. के. भोसले करत आहेत.