‘त्या’ व्हायरल ऑडिओ क्लिपबद्दल डीसीपींनी केले धक्कादायक खुलासे
'त्या' आयपीएस अधिकाऱ्याने केलेल्या गौप्यस्फोटाची चौकशी होणार का?
पुणे : राज्यात अगोदरच पोलिसांचे वाभाडे निघाले आहेत. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सचिन वाझेला 100 कोटी रुपये वसुली करण्यास सांगितले होते, असा गौप्यस्फोट केला होता. हे प्रकरण ताजे असतानाच पुणे पोलीस दलातील IPS महिला अधिकाऱ्याची ‘बिर्याणी’ पप्रकरणाची ऑडीयो क्लिप व्हायरल झाली अन एकच खळबळ उडाली. यावर डिसीपींनी धक्कादायक खुलासा केला आहे. पुणे पोलीस दलात वर्षानुवर्षे एकाच ठिकाणी काम करणार्या पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या हप्ता वसुलीची ‘पोलखोल’ केली आहे. पुणे पोलीस दलात हप्ता वसुलीचे रॅकट असल्याचा गौप्यस्फोट केला आहे. आता याची चौकशी होणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
पोलिस उपायुक्त प्रियंका नारनवरे यांच्या आवाजातील एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. यासंदर्भात खुलासा करताना त्या म्हणाल्या, पोलीस आयुक्तालयातील काही कर्मचारीच आपल्याला त्रास देतात. झोन-1 च्या कार्यालयात वर्षानुवर्षे काम करणार्या काही कर्मचार्यांची त्यांनी पोलखोल केली आहे. तर यापुर्वी झोन-1 मध्ये कार्यरत असलेल्या पोलिस उपायुक्तांबाबत देखील त्यांनी विधान केलं आहे. मी शिस्तप्रिय अधिकारी असून मी इथे आल्यामुळे अनेकांचे हितसंबंध दुखावले गेले आहेत. त्यांचे हप्ता वसुलीचे रॅकेट आहे, असा गौप्यस्फोट नारनवरे यांनी केला आहे.
नारनवरे यांनी सांगितले की, व्हायरल झालेली ऑडिओ क्लिप ही मार्फ ऑडिओ क्लिप (Marf audio clip) आहे. यातील संदर्भ हा जुना आहे. माझ्या कार्यालयातील जे पोलीस अधिकारी, कर्मचारी 10-10 वर्षे झाले ते हप्ता वसुली करायचे. त्यांची बदली (Transfer) करण्यात आली. तरी देखील ते तेथून हप्ता वसूल करीत होते. मी आल्यापासून येथील कर्मचाऱ्यांचे हितसंबंध दुखावले आहेत.
नवीन उद्योग सुरु करण्याचे काम काही कर्मचारी करीत होते. त्यांचे मोठे रॅकेट आहे. त्याच्याबाबत पोलीस आयुक्तांकडे मी लेखी तक्रार दिली आहे. पोलीस आयुक्तांनी कारवाई करतो असे सांगितल्याचे नारनवरे यांनी म्हटले आहे. मी उपायुक्त म्हणून परिमंडळ एक येथे येण्यापूर्वी यांचे सर्व गैरव्यवहार सुरु होते. त्यांचे रॅकेट सेट होते. अजूनही इथून काही लोकांना हप्ते जातात. काही दिवसांपूर्वी एका खंडणी प्रकरणात देखील त्यांचा संबंध होता. मी आल्यानंतर त्यांचे हे गैरप्रकार बंद केले. मी शिस्तप्रिय अधिकारी आहे. मी इथे आल्याने त्यांचे हितसबंध दुखावले गेल्याचे, नारनवरे यांनी सांगितले.
आधीच्या डिसीपींना मुख्यालयात जावे लागले
मी परिमंडळ एक मध्ये आल्याने आधीच्या डिसीपींना मुख्यालयात जावे लागले. मी थेट आयपीएस असल्याने माझ्याबाबत अनेकांना हेवा वाटतो. बदल्या होणार असल्याच्या निर्णयाच्या वेळी ही क्लिप बाहेर आणली आहे. त्यांनी आपण वेळोवेळी जे बोललो त्यातमध्ये बदल करुन ही क्लिप तयार केली आहे. ही क्लिप मार्फ असल्याचे त्यांनी सांगितले.
बिर्याणी प्रकरणात चौकशी करुन अहवाल सादर करण्याचे आदेश गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी पोलीस आयुक्तांना दिले आहेत. मात्र डीसीपी नारनवरे यांनी केलेले गौफस्फोट ही गंभीर आहेत. पोलीस आयुक्तालयात सुरु असलेल्या वसुली रॅकेट बाबत त्यांनी स्पष्टीकरण केले आहे. याची चौकशी करण्याचे आदेश गृहमंत्री देणार का ? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.