सोलापूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण महाराष्ट्रात कडक निर्बंध सुरु असताना सराफ दुकानं सुरु ठेवल्याने पोलिसांनी दुकानं सील केलं होते. यावेळी पोलिसांनी तब्बल 5 लाख रुपयांची मागणी केली आणि ते देण्यास नकार दिल्याने दुकानं सील केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
विशेष म्हणजे ”हे सर्व हप्ते गृहमंत्रालयापर्यंत पोहचवावे लागतात,” असं पोलिस अधिकारी म्हटल्याचा आरोप केला आहे. याबाबतचा व्हिडिओ स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी ट्वीट करत या प्रकरणाला उजेडात आणलं आहे.
या संपूर्ण प्रकरणा संदर्भात संबंधित पोलीस अधिकाऱ्याशी संपर्क केला असता, त्यांनी हे संपूर्ण आरोप फेटाळले आहेत आणि संबंधित सराफ व्यापाऱ्यावर अब्रू नुकसानीचा दावा ठोकणार असल्याचे सांगितले आहे.