तुम्हाला हे माहीत आहे का ?, मद्यालाही असते Expiry Date!

0

नवी दिल्ली : मद्य जितके जुने तितकी त्याची चव चांगली असे म्हणतात. पण तुम्हाला हे माहितेय का की, प्रत्येक प्रकारच्या अल्कोहोलच्या बाबतीत हे सारखे नसते? काही प्रकारचे अल्कोहोल कालबाह्य होतात.

तुम्हाला स्कॉच किंवा जिनची ती उरलेली बाटली प्यायचा मोह होतो, जी शेवटची महिने किंवा वर्षांपूर्वी उघडली होती, परंतु आम्हाला हे कधीच कळू शकले नाही की त्याची किंमत नव्हती! बिअर, वाईन आणि इतर सर्व प्रकारचे मद्य यांसारखे अल्कोहोल वेगवेगळे घटक आणि प्रक्रिया वापरून बनवले जातात. आणि जी मूळ प्रक्रिया उरते ती म्हणजे – फरमेंटेशन, ज्याद्वारे सर्व प्रकारचे मद्य तयार होतात. ज्यामध्ये यीस्ट आणि साखर असते. त्याचे योग्य प्रमाण काय असेल यावर अल्कोहोल तयार होणे, अवलंबून असते. उदाहरणार्थ व्हिस्कीसारख्या हार्ड लिकरचे शेल्फ लाईफ अनिश्चित असते. पण, १-२ वर्षांनी उघडल्यावर त्याची चव कमी होऊ लागते. अल्कोहोलचे शेल्फ लाईफ इतर अनेक घटकांवर अवलंबून असते. म्हणूनच अल्कोहोलचा योग्यरित्या संग्रह कसा करावा आणि ते शेवटपर्यंत चांगले कसे टिकेल याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. त्यासाठी या टिप्स.

टकिला (Tequilla) टकिला ही अशा मद्यांपैकी एक मानली जाते जी तुम्ही प्यायल्यावर त्याची नशा न चढता तुम्ही लवकर शांत होता. एकदा बाटली उघडल्यानंतर टकीला बाटली लवकर खराब होऊ शकते. टकिलाची बाटली जितकी जास्त वेळ उघडली जाते तितकी तिची ताकद आणि सुगंध गमावते. जर बाटली तुमच्या घरात वर्षभरापासून पडून असेल तर त्यामुळे अपाय होणार नाही. पण, टकीला शॉट घेण्यापूर्वी, तुमच्या अंतःप्रेरणेवर विश्वास ठेवा. चांगला वास येत नसेल तर फार विचार न करता लगेच फेकून द्या.

रम (Rum) या हार्ड लिकरचे शेल्फ लाईफ जास्त आहे. पण बाटली न उघडेपर्यंत तसेच त्याचे सील ओपन करेपर्यंतच हे शक्य आहे. एकदा का तुम्ही रमच्या बाटलीचा सील उघडले की, ऑक्सिडेशन प्रक्रिया वेगाने होते. त्यामुळे त्याची चव कमी होते. रम उघडल्यावर ती जास्त काळ टिकण्यासाठी, तुम्ही स्क्रू-टॉप क्लोजरची निवड करू शकता. त्यामुळे जे रम कोरडी होण्यापासून वाचू शकते. पण, जर रमची बाटली उघडली असेल, तर तुम्ही ती एका छोट्या बाटलीत साठवून त्याचे तोंड घट्ट बंद करून ठेवू शकता. अशा प्रकारे, त्याची चव आणि फ्लेवर न गमावता किमान 6 महिन्यांसाठी ती ठेवता येईल.

व्होडका (Vodka) बाटली उघडल्यावर जास्त काळ साठवून ठेवल्या जाणार्‍या मद्यांपैकी व्होडका आहे. कारण याचे ऑक्सिडेशन कमी वेगाने होते. त्यासाठी खूप काळ जावा लागतो. मात्र त्याची चव आणि फ्लेवर कमी होतो. उघडलेली बाटली साठवण्यासाठी, ती स्क्रू-टॉप क्लोजरसह थंड आणि गडद ठिकाणी ठेवावी, असे सांगितले जाते. तसेच, शक्यतो सूर्यप्रकाशापासून दूर ठेवणे चांगले असते.

बीअर (Beer)अल्कोहोलचा हा अत्यंत सामान्य प्रकार आहे. याची एक्सपायरी डेट बॉटलवर आधीच लिहिलेली असते. त्यामुळे लोकांनाही साधारणरपणे कल्पना असते. बिअरचा कॅन असो किंवा बाटली, एकदा उघडली की एक-दोन दिवसांत ती प्यायली पाहिजे. एकदा उघडल्यानंतर, हवेतील ऑक्सिजनता बिअरशी संपर्क येतो. (ज्याला ऑक्सिडेशन म्हणतात) त्यानंतर त्याची चव खूपच खराब होते. शिवाय, बिअरची फिझ एक दिवसानंतर निघून जाते. बिअर जास्त काळ टिकण्यासाठी, प्रकाशापासून दूर ठेवावी. चव आणि फ्लेवर टिकवून ठेवण्यासाठी बिअर नेहमी थंड आणि गडद ठिकाणी ठेवा.

व्हिस्की (Whiskey)व्हिस्कीची बाटली उघडल्यानंतर, ऑक्सिडेशन होते. त्यामुळे पेयाची चव आणि फ्लेवर बदलतो. व्हिस्कीची बाटली ज्या तापमानात साठवली जाते त्याचाही चवीवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे, व्हिस्की तुम्ही ती डार्क आणि थंड ठिकाणी ठेवली पाहिजे. तेथे खूप मर्यादित हवा असेल याची खात्री करावी. तसेच, व्हिस्कीची बॉटल उभी ठेवावी, कारण त्याचे झाकण व्हिस्कित विरघळू शकते. आडवी ठेवल्यास ऑक्सिडेशन प्रक्रिया होते.

Leave A Reply

Your email address will not be published.