नवी दिल्ली : करोना संसर्गाची गती मंदावल्याने आयटी क्षेत्रात नोकऱ्या निर्माण झाल्या आहेत. आयटी कंपन्या अनुभवी तरुणांना आकर्षित करण्याच्या प्रयत्नात आहेत. जर तुम्ही TCS iON करिअर एजमधून डिजिटल प्रमाणपत्र अभ्यासक्रम केलात तुम्हाला नोकरीची हमी मिळू शकते. कारण यामध्ये सध्याच्या युगात आवश्यक अभ्यासक्रमाची तयारी करुन घेतली जाईल.
विशेष म्हणजे हा विनामूल्य कोर्स आहे. त्यामुळे तुमची यामधील आर्थिक गुंतवणूक शून्य रुपये असेल. आणि त्यातून बरंच काही शिकायला मिळेल. टीसीएसचा हा १५ दिवसांचा डिजिटल कोर्स आहे. हा अभ्यासक्रम आजच्या तरुणांना भविष्यात घेण्याच्या मुख्य रोजगार कौशल्यांनी सुसज्ज करण्याच्या उद्देशाने तयार करण्यात आला आहे.
सध्या नोकरी मिळविणे हे एक आव्हान बनले आहे. हे युग पूर्वीपेक्षा अधिक स्पर्धात्मक बनत चालले आहे. यामुळे तरुणांवर सर्वोत्तम कामगिरी करण्याची जबाबदारी आहे. युवकांनी कम्युनिकेशन, कोऑपेशन, बिझनेस इथिक्स, आर्थिक आणि डिजिटल साक्षरता यांसारख्या मुख्य रोजगार देणाऱ्या कौशल्यांनी सुसज्ज असणे ही काळाची गरज आहे. यामुळे तरुणांना भविष्यात नोकरी मिळण्याच्या संधी वाढतात.
टीसीएस आयनतर्फे अकाऊंटन्सी, आयटी आणि आर्टिफिशिअल इंटेलिजन्समध्ये मेजर बिझनेस, कम्युनिकेशन्स आणि बेसिक स्किल्सचा अभ्यास केला जाणार आहेत. तसेच यंग प्रोफेशनलसाठी १४ मॉड्यूलवर काम केले जात आहे. प्रत्येक मॉड्यूल हे एक किंवा दोन तासांचे असेल. यामध्ये व्हिडीओ, सादरीकरण, वाचन साहित्य, टीसीएस तज्ञांनी रेकॉर्ड केलेले वेबिनार आणि मॉड्यूल ऑफ-एंड, स्वयं-मूल्यांकनाचा समावेश आहे. या प्रशिक्षणामुळे तरुण वर्ग वर्तमानातील नोकरीच्या संधींशी जोडला जाऊ शकेल.
TCS ION च्या करिअर एज अभ्यासक्रमात स्वत: चे मूल्यांकन हा एक महत्त्वाचा भाग आहे. यामध्ये विद्यार्थ्यांकडून स्वत:च्या संकल्पनांच्या आकलनाचे मूल्यांकन करुन घेतले जाते. विद्यार्थ्याने अभ्यासक्रम योग्यरित्या पूर्ण केला तर त्यांना वैयक्तिक प्रमाणपत्र मिळते.
याव्यतिरिक्त शिकणाऱ्यांना मॉडरेटेड डिजिटल चर्चा कक्षेत प्रवेश मिळतो. यामध्ये विद्यार्थ्यांना आपले प्रश्न उपस्थित करुन (पोस्ट करुन) त्यावर आपले मत मांडण्याची संधी मिळते. मॉडरेटर काही वेळातच पोस्ट केल्या गेलेल्या प्रश्नांची उत्तरे देतो. याशिवाय हा अभ्यासक्रम कुठेही, कधीही, कोणत्याही उपकरणासोबत शिकता येतो. ज्यामुळे शिकणे अधिक सोपे होते.
TCS ION चा हा कोर्स करण्यासाठी पदवीधर किंवा पदवीचे शिक्षण घेत असलेले विद्यार्थी अर्ज करू शकतात. यासाठी विद्यार्थ्यांना प्रथम नोंदणी करावी लागेल. नोंदणी प्रक्रिया TCS च्या वेबसाईटवर उपलब्ध आहे. हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांना विविध स्पर्धात्मक प्रवेश परीक्षांना तोंड देणे सोपे होईल.