मार्चच्या तुलनेत जवळपास चौपट वाढ झाल्याचं पहायला मिळतंय. या वर्षी बिटकॉइनच्या किंमतीत तब्बल 170 टक्क्यांची वाढ झाली आहे. कमी काळात जास्त फायदा मिळवण्यासाठी काही बड्या गुंतवणुकदारांनी बिटकॉइनमध्ये गुंतवणूक केल्याने त्याच्या किंमतीत तेजी आली आहे.
मागील तीन वर्षानंतर पहिल्यांदाच एवढी तेजी पहायला मिळतंय. गुरुवारी एका बिटकॉइनची किंमत 22,655 डॉलर्स इतकी झाली आहे. रुपयामध्ये एका बिटकॉइनची किंमत 16,93,972 इतकी आहे.
बिटकॉइन ही एक व्हर्च्युअल करन्सी आहे. डॉलर,रुपया किंवा इतर चलनाचा वापर ज्या पध्दतीनं केला जातो तशाच पध्दतीनं पण डिजिटल स्वरुपात बिटकॉइनचा वापर केला जातो. ऑनलाइन पेमेंटव्यतिरिक्त डॉलर किंवा इतर चलनामध्ये याचे रुपांतर केले जाऊ शकते.