जळगाव मध्ये दोन गटात वाद

0

जळगाव : धार्मिक स्थळाच्या बांधकामावरून‎ दोन गटात वाद झाल्याने शहरातील‎ एमआयडीसी परिसरातील सुप्रीम‎ काॅलनीत रविवारी दुपारी तुफान‎ दगडफेक झाली. यावेळी दोन्ही‎ गटाचे दोनशे-अडीचशे तरुण‎ समोरासमोर आले होते.‎ दगडफेकीत ५ जण जखमी झाले‎ असून, दंगा नियंत्रण पथकासह‎ अतिरिक्त पोलिस कुमक तैनात‎ करण्यात आली आहे. या प्रकरणी‎ रात्री दहा वाजेपर्यंत गुन्हा दाखल‎ करण्याचे काम सुरू होते. तसेच‎ कोणालाही अटक केली नव्हती.‎

काही तरुण व महिलांनी लहान‎ मुलांना मारहाण केल्यावर वाद सुरू‎ झाला. हे समजताच मोठ्या संख्येने‎ तरुण जमा झाले आणि दोन्ही गटांनी‎ एकमेकांवर जोरदार दगडफेक‎ केली. त्यानंतर दंगानियंत्रण पथक,‎ चार्ली यंत्रणा व शहरातील सर्व‎ पोलिस ठाण्यातील कर्मचाऱ्यांना‎ याबाबत सूचना देण्यात आल्या.‎ अप्पर पोलिस अधीक्षक रमेश‎ चोपडे व उपविभागीय पोलिस‎ अधिकारी संदीप गावित यांच्यासह‎ एमआयडीसी पोलिस ठाण्याची‎ डीबी टीम घटनास्थळी दाखल‎ झाली. दंगानियंत्रण पथकाने‎ परिसरात पथसंचलन केले.‎ दगडफेकीत पाच जखमी‎ दगडफेकीत रवींद्र राठोड,‎ समाधान राठोड, साजन राठोड,‎ पवन पाटील, दीपक घुगे व‎ श्रीकांतसिंग चाैधरी हे जखमी झाले.‎

घटनेनंतर तरुणांना महिलांनी‎ मारहाण केल्याची माहिती‎ मिळाल्यावर दुसऱ्या गटाच्या ६०‎ महिला थेट एमआयडीसी पोलिस‎ ठाण्यात धडकल्या. त्यांनी मारहाण‎ करणाऱ्या महिलांवर गुन्हे दाखल‎ करण्याची मागणी केली. यावेळी‎ तरुणही मोठ्या संख्येने होते.‎

Leave A Reply

Your email address will not be published.