पुणे : दरवर्षी प्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी करत असताना देशावर आणि राज्यावर आलेल्या कोरोना व्हायरसचे सावट लक्षात घेऊन, राष्ट्रीय साततोटी हौद मंडळ ट्रस्ट, पुणे यांनी चांगला उपक्रम राबविला.
मंडळाच्या वतीने महाराजांचे थोर विचार रयतेच्या चांगल्यासाठी होते त्याचा आदर्श घेत, सामाजिक भान ठेवून गरजू नागरिकांना मास्क आणि धान्य वाटप केले. तसेच हॉस्पिटल मध्ये जेष्ठ नागरिकांच्या मोतीबिंदू ऑपरेशन झाल्यावर लागणारे चष्मे वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाला मंडळाचे अध्यक्ष स्वप्नील दळवी, रामदास तिवसकर, प्रमोद रसाळ, बबलू गायकवाड, प्रशांत कोलते, किरण शिंदे, खडके, सतीश रुके आदी मान्यवर उपस्थित होते.