आंध्र प्रदेश : आंध्र प्रदेशमध्ये मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांचे पोस्टर फाडल्याप्रकरणी कुत्र्याविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, दसरी उदयश्री नावाच्या एका तेलगू देसम समर्थक महिलेने विजयवाडा पोलिस स्टेशनमध्ये याबाबत तक्रार दाखल केली आहे.
हा मुख्यमंत्र्यांचा अपमान असल्याचे उदयश्री यांनी तक्रारीत म्हटले आहे. कुत्रा आणि त्याला भडकवणाऱ्या आणि आता व्हिडिओ व्हायरल करणाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी आपल्या तक्रारीत केली आहे.
याचा एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये कुत्र्याने आधी रेड्डी यांचे भिंतीवरील पोस्टर काढले आणि नंतर ते फाडले. तर तक्रारदाराने दावा केला आहे की जगन मोहन रेड्डी यांच्याबद्दल मला आदर आहे, परंतु आंध्र प्रदेशातील एक कुत्रा त्यांचा अपमान करत आहे.