नवी दिल्ली ः अमेरिकेचील काॅपिटाॅल इमारतीत ट्रम्प समर्थकांनी केलेल्या हिसेंचा फटका सरळ डोनाल्ड ट्रम्प यांना बसलेला आहे. अमेरिकेत झालेल्या हिंसाचाराच्या उद्रेकानंतर आणि भविष्यातही हिंसेला चिथावणी मिळण्याची भीती व्यक्त करत ट्विटरने डोनाल्ड ट्रम्पचे अकाउंट कायमचं बंद केलेलं आहे.
या घटनेनंतर ट्रम्प यांचे काही ट्विट्स डिलीट केलेली होती. त्यानंतर काही काळापुरते अकाउंट बंद करण्याचा इशाराही ट्विटरने ट्रम्प यांना दिलेला होता. मात्र, आता ट्विटरने डोनाल्ड ट्रम्प यांचे ट्विटर अकाउंट कायमचे बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
हिंसक आंदोलनादरम्यान ट्रम्प यांनी काही ट्विट्स केलेली होती. ते ट्विट्स पाहून त्यांची समिक्षा करून ट्विटरने भविष्यात अशा ट्विट्सने आणखी हिंसा घडण्याची शक्यता आहे, असे सांगून ट्रम्प यांचे ट्विटर अकाउंट कायमचे बंद करण्यात आले आहे.