शहरातील सामान्य नागरिकांना बाजारातील रेमडेसिवीर इंजेक्शनचे दर परवडणारे नाहीत. त्यामुळे सत्ताधारी भा.ज.पा.ने महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये उपचार घेणाऱ्या कोरोना बाधित रुग्णांना रेमडेसिवीर इंजेक्शन मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे.
त्यानुसार महापालिका रुग्णालयात उपचार घेणाऱ्या प्रत्येक कोरोनाबाधित रुग्णाला मोफत इंजेक्शन मिळाले पाहिजे.
सध्या रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा जाणवत असल्याच्या तक्रारी येत आहे. कोरोनाबाधित रुग्णांना आवश्यक असलेल्या रेमडेसिवीर तुटवडा जाणवू देऊ नका, त्याचा पुरेसा साठा ठेवण्यात यावा. रेमडेसिवीर इंजेक्शन अभावी कोणाचा बळी जाता कामा नये. याची प्रशासनाने खबरदारी घ्यावी. त्याची तक्रार येऊ देऊ नका, रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळा बाजार होऊ देऊ नका, त्यावर महापालिकेने अंकुश ठेवावा. याबाबत उपमहापौर हिराबाई (नानी) घुले यांनी आयुक्त यांना सुचना दिल्या आहेत.