औरंगाबाद : राज्यभरात गाजत असलेल्या डॉ. राजन शिंदे हत्याकांडाचा उलगडा करण्यात अखेर सोमवारी औरंगाबाद पोलिसांना यशआले. या हत्येसाठी वापरलेली शस्त्रे सोमवारी सकाळी शिंदे यांच्या घराजवळील विहिरीतून शोधून काढण्यात आली. यामध्ये हत्येसाठीवापरलेले डंबेल्स, चाकू आणि रक्त पुसण्यासाठी वापरलेला टॉवेल विहिरीतून बाहेर काढण्यात आला. गेल्या काही दिवसांपासून सुरूअसलेला छळ असह्य झाल्याने शिंदे यांची हत्या केल्याची कबुली अल्पवयीन संशयितांनी दिल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली. यासंशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
डॉ. शिंदे यांच्या हत्याकांडप्रकरणी त्यांचा निकटवर्तीय संशयित पोलिसांच्या नजरेखाली आहे. मात्र, मुबलक पुराव्याअभावी पोलीसरिस्क घेत नव्हते. अखेर मोठ्या शिताफीने, कुठलीही बेपर्वाई न करता या ‘हाय प्रोफाइल केस’चा अत्यंत शांत डोक्याने, तंत्रशुद्धपद्धतीसह ‘इमोशनल थेअरी’ चा वापर करून पोलिस पुराव्यापर्यंत पोहोचण्यात यशस्वी ठरले आहेत. हत्येसाठी वापरलेल्या शस्त्रांच्याशोधासाठी शिंदे यांच्या घराजवळील विहिरीत मोहीम सुरू होती. हत्येसाठी वापरले गेलेले डंबेल्स, चाकू आणि पुरावा नष्ट करण्याच्याहेतूने रक्ताच्या साफसफाईसाठी वापरलेला टॉवेल विहिरीतून काढून पोलिसांनी जप्त केला.
यातील डंबेल्सने प्रा. शिंदे यांच्या डोक्यावर प्रहार करण्यात आला, तर चाकूने शिंदे यांचा गळा चिरण्यात व दोन्ही हाताच्या नसाकापण्यात आल्याचा पोलिसांना संशय आहे. अनेक वर्षांपासून शिंदे यांच्याकडून छळ सुरू असल्याने आपण तणावात होतो. त्यातूनसावरण्यासाठी ओटीटीचा सहारा घेतला. त्यातूनच त्याला ‘थ्रिलर वेब सिरीज’ पाहण्याचा नाद लागला. हत्येच्या रात्री छळ असह्यझाल्याने झोपेतच शिंदे यांची डोक्यात डंबेल्सने वार करून हत्या केली आणि गळा व नसा कापल्याची कबुली संशयिताने दिल्याचेसूत्रांचे म्हणणे आहे.