परभणी : शहरासह जिल्ह्यात काल शुक्रवारी रात्री मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. या पावसामुळे शनिवार दि. ९ जुलै रोजी पहाटे ५ वाजण्याच्या पालम तालुक्यातील लेंडी नदीला मोठा पूर आला होता. नदीचे पात्र काठोकाठ भरून वाहत असल्याने दोन ठिकाणी रस्ता बंद पडून पालम शहराचा १६ गावांचा संपर्क तुटला आहे. नदीच्या पुराचे पाणी दिवसभर ओसरले नसल्याने वरील गावांतील ग्रामस्थांना गावातच अडकून पडावे लागले.
दरम्यान पूर्णा तालुक्यातील कावलगाव, चुडावा, वजूरी, एरंडेश्वर, कातनेश्वर, आहेरवाडी, ताडकळस, धनगर टाकळी, सारंगी, मीठापूर, धानोरा काळे, पांगरा डोळे, ंिपपळा भरते, आलेगाव, आहेरवाडी, एरंडेश्वर, कातनेश्वर, सुहागन, बरबडी या परिसरामध्ये मागील दोन दिवसापासून पाऊस पडत असून यातील पाच गावांचा संपर्क तुटल्याचे समजते.
परभणी शहरासह जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून पावसाने हजेरी लावली आहे. संपूर्ण जिल्ह्यात काल शुक्रवारी रात्री जोरदार पाऊस झाला. या पावसाची ५.०० मिमी. पावसाची नोंद झाली आहे. यामध्ये परभणी तालुका५.८६, गंगाखेड 6.93, पाथरी ३.९४, जिंतूर २.५८, पूर्णा ६.१९, पालम ६.०४, सेलू २.३४, सोनपेठ 72. 9 आणि मानवत तालुक्यात 51.5 मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली आहे. जिल्ह्याची वार्षिक सरासरी 76.13 मि.मी. असून १ जूनपासून आजपर्यंत जिल्ह्यात सरासरी ३.२१ मि.मी. पाऊस झाला आहे.