व्हिटॅमिन बी 12 मिळवण्यासाठी खा ‘हे’ पदार्थ

0

नवी मुंबई : Vitamin B12 खूप लोकांना सकाळी उठल्यानंतर थकवा जाणवतो. इतकेच नव्हे तर जर थकव्यासोबत तुम्हाला सुस्तावल्या सारखेही वाटत असेल तर तुम्ही कोणतेही काम करू शकत नाही. याचा अर्थ तुमच्या शरीरामध्ये व्हिटॅमिन बी 12ची कमतरता आहे. त्यात जर तुम्ही मांसहार करत नसाल तर तुम्हाला व्हिटॅमिन बी 12 ची कमतरता पूर्ण करणे अवघड असते. अशावेळी तुम्हाला आहारात अशा गोष्टींचा समावेश केला पाहिजे ज्यामुळे तुमच्या शरीरामध्ये व्हिटॅमिन 12 ची कमतरता पूर्ण होऊ शकते. अशावेळी आम्ही तुम्हाला विटॅमिन बी १२ ची कमतरता दूर करण्यासाठी तुम्हाला कोणत्या गोष्टींचे सेवन केले पाहिजे जाणून घ्या…

दही (Curd) : दहीमध्ये बी-कॉम्पलेक्स व्हिटॅमिन्स जैसे व्हिटॅमिन्स बी2 आणि व्हिटॅमिन्स बी12 चे प्रमाण भरपूर असते. तसेच तुम्ही लो फॅट दही देखील खाऊ शकता.असे केल्यामुळे लठ्ठपणा वाढणार नाही आणि दहीमुळे संपूर्ण शरीराला पोषण देखील मिळेल. या शिवाय दह्यामध्ये सोडियम मॅग्नेशिअम आणि पोटेशिअम सारखे पोषक तत्व देखील असतात जे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. रोज दुपारच्या जेवणामध्ये तुम्ही दही खाऊ शकता.

ओटमील (Oatmeal): ब्रेकफास्टमध्ये ओटमीलचा समावेश केल्यास तुमच्या शरीराला फक्त योग्य पोषणच नव्हे तर बी १२ ची कमतरताही पूर्ण होते. ओटमील एक हेल्दी ब्रेकफास्ट आहे.

नॉन व्हेज खाणाऱ्यांनी जेवणात सी फूड (मासे), अंडी ही नित्य नियमित घ्यावीत. यामुळे व्हिटॅमिन 12 वाढते.

Leave A Reply

Your email address will not be published.