नागपूर : अनेक कॉग्रेसचे नेत्यांचे वकील असलेले, राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात कोर्टात खटला दाखल करणारे वकील सतीश उके यांच्या घरी ईडीने आज सकाळी छापा मारला. नागपूर येथील घरी छापा मारण्यात आला. त्यांच्या कुटुंबियांचे मोबाईल, लॅपटॅाप ईडीने जप्त केले आहेत.
जमिनीच्या व्यवहारांबाबत ईडीने ही कारवाई केल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. सहा तासाच्या चैाकशीनंतर सतिश उके यांना सक्तवसुली संचालनालयाच्या पथकाने (ईडी) ताब्यात घेतलं. त्याचे भाऊ प्रदीप उके यांनाही ईडीनं ताब्यात घेतलं आहे.
नागपुरातील प्रेस क्लब मध्ये एका दुसऱ्या विषयावर प्रेस कॉन्फरन्स घेऊन बाहेर पडत असताना नागपूर पोलिसांच्या गुन्हे शाखेचे पोलीस चौकशीसाठी घेऊन गेले होते. अनेक तास चौकशी केल्यानंतर पोलिसांनी गुन्हा तर दाखल केला होतं. मात्र सतिष उके यांच्यावर ठोस कारवाई करण्यात आली नव्हती. सतीश उके हे कॉग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे वकील आहेत.
सतीश उके गेल्या अनेक वर्षापासून कॉग्रेस नेत्यांची वकील करीत आहेत. काही आठवड्यांपूर्वी एका साठ वर्षीय वृद्ध महिलेने एडवोकेट सतीश उके यांच्यावर अनेक वर्षांपूर्वी धमकावून जमीन आपल्या नावावर केल्याचा आरोप करत पोलिसांकडे तक्रार दिली होती. या छाप्याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. आज पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास ही कारवाई झाली. या कारवाईमागे भाजपचे षडयंत्र असल्याचे बोललं जाते.