राज्यातील 92 नगरपरिषदा आणि चार नगरपंचायतीच्या निवडणुका स्थगित

0

मुंबई : राज्यातील 92 नगरपरिषदा आणि चार नगरपंचायतीमधील सार्वत्रिक निवडणुका स्थगित करण्यात आल्या आहेत. 8 जुलै रोजी निवडणूक आयोगानं नगरपरिषदा आणि नगरपंचायतीच्या निवडणुका जाहीर केल्या होत्या. मात्र, ओबीसी आरक्षणाची सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. त्यामुळे 19 जुलै रोजी कोर्टात होणाऱ्या सुनावणीनंतरच पुढील निर्णय घेण्यात येणार आहे. निवडणूक कार्यक्रम स्थगित झाल्यामुळे सर्व क्षेत्रात जाहीर करण्यात आलेली आचारसंहिताही लागू होणार नाही. निवडणूक आयोगाकडून याबाबतचे परिपत्रक काढण्यात आले आहे.

ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका घेऊ नयेत, अशी भूमिका राज्यातील सर्वच नेत्यांनी घेतली होती. यामध्ये सत्ताधाऱ्यांसह विरोधकांचाही समावेश होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, नाना पटोले, पंकजा मुंडे, जयंत पाटील, धनंजय मुंडे यांच्यासह राज्यातील सर्वच नेत्यांनी ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका घेऊ नये अशी भूमिका घेतली होती. हे प्रकरण कोर्टात गेलेय. त्यामुळे आता 19 तारखेनंतरच पुढील निर्णय होण्याची शक्यता आहे.

92 नगरपरिषदा व 4 नगरपंचायतीमध्ये निवडणुका स्थगित

‘अ’ वर्गातील नगरपरिषदा

1. भुसावळ (जि. जळगाव)
2. बारामती (जि. पुणे)
3. बार्शी (जि. सोलापूर)
4. जालना (जि. जालना)
5. बीड (जि. बीड)
6. उस्मानाबाद (जि. उस्मानाबाद)

‘ब’ वर्गातील नगरपरिषदा

1. नाशिक जिल्हा
2. मनमाड
3. सिन्नर
4. येवला

धुळे जिल्हा

1. दोंडाईचा-वरवाडे
2. शिरपूर-वरवाडे

नंदुरबार जिल्हा

1. शहादा

जळगाव जिल्हा

1. अमळनेर
2. चाळीसगाव

अहमदनगर जिल्हा

1. संगमनेर
2. कोपरगाव
3. श्रीरामपूर

पुणे जिल्हा

1. चाकण
2. दौंड

सातारा जिल्हा

1. कराड
2. फलटण

सांगली जिल्हा

1. इस्लामपूर
2. विटा

सोलापूर जिल्हा

1. अक्कलकोट
2. पंढरपूर
3. अकलूज (नवनिर्मित)

कोल्हापूर जिल्हा

1. जयसिंगपूर

औरंगाबाद जिल्हा

1. कन्नड
2. पैठण

बीड जिल्हा

1. अंबाजोगाई
2. माजलगाव
3. परळी – वैजनाथ

लातूर जिल्हा

1. अहमदपूर

अमरावती जिल्हा

1. अंजनगाव-सुर्जी

क’ वर्गातील नगरपरिषदा

नाशिक जिल्हा
1. चांदवड
2. नांदगाव
3. सटाणा
4. भगूर

जळगाव जिल्हा

1. वरणगाव
2. धरणगाव
3. एरंडोल
4. फैजपूर
5. पारोळा
6. यावला

अहमदनगर जिल्हा

1. जामखेड
2. शेवगाव
3. देवळाली प्रवरा
4. पाथर्डी
5. राहता
6. राहुरी

पुणे जिल्हा

1. राजगुरूनगर
2. आळंदी
3. इंदापूर
4. जेजुरी
5. सासवड
6. शिरुर

सातारा जिल्हा

1. म्हसवड
2. रहिमतपूर
3. वाई

सांगली जिल्हा

1. आष्टा
2. तासगाव
3. पलूस

सोलापूर जिल्हा
1. मोहोळ
2. दुधनी
3. करमाळा
4. कुर्डुवाडी
5. मेंदगी
6. मंगळवेढा
7. सांगोला

कोल्हापूर जिल्हा

1. गडहिंग्लज
2. कागल
3. कुरुंदवाड
4. मुरगूड
5. वडगाव

औरंगाबाद जिल्हा

1. गंगापूर
2. खुलताबाद

जालना जिल्हा
1. अंबड
2. भोकरदन
3. परतूर

बीड जिल्हा

1. गेवराई
2. किल्ले धारुर

उस्मानाबाद जिल्हा

1. भूम
2. कळंब
3. मुरुम
4. नळदुर्ग
5. उमरगा
6. परंडा
7. तुळजापूर

लातूर जिल्हा

1. औसा
2. निलंगा

अमरावती जिल्हा

1. दर्यापूर

बुलडाणा जिल्हा

1. देऊळगाव राजा

चार ग्रामपंचायतींच्या निवडणुका

1. अहमदनगर – नेवासा
2. पुणे/आंबेगाव – मंचर (नवनिर्वाचित) –
3. पुणे/बारामती – माळेगाव बुद्रुक (नवनिर्वाचित)
4. सोलापूर/मोहोळ – सोलापूर

Leave A Reply

Your email address will not be published.