सातारा : जिल्हा सोमवारपासून हळू हळू अनलॉक होणार आहे. भाजीपाला, किराणा, बँकांसह अत्यावश्यक सेवा सुरु करण्याचे आदेश जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी रविवारी दिले आहेत. जिल्ह्यात सोमवार ते शुक्रवारपर्यंत सकाळी ९ ते २ दुपारीपर्यंत अत्यावश्यक सेवेतील दुकाने सुरू राहणार आहेत. मात्र, शनिवार व रविवारी वीकेंड लॉकडाऊन लागू करण्यात आला असून अनलॉकमध्येही सोमवार ते शुक्रवारी सायंकाळी ५ ते पहाटे ५ वाजेपर्यंत संचारबंदी लागू राहणार आहे.
हे राहणार सुरू…
किराणा दुकाने, भाजीपाला, फळ विक्रेते, डेअरी, बेकरी, मटण, चिकन, अंडी, मासे, सर्व प्रकारच्या खाद्यपदार्थांची दुकाने, रूग्णालये, निदान केंद्रे, दवाखाने, लसीकरण केंद्रे, वैद्यकीय विमा कार्यालये, औषध दुकाने, औषध कंपन्या, बँका, शिवभोजन थाळी, सर्व वित्तीय संस्था, बाजार समिती, वैद्यकीय व आरोग्य सेवा पुरवणारी केंद्रे, वाहतूक व पुरवठा साखळी, आवश्यक घटकातील कच्चा माल, गोदामे, सार्वजनिक वाहतूक, मान्सूनपूर्व कामे, दूर संचार सेवांची देखभाल दुरूस्ती, पाणी पुरवठा सेवा, शेतीसंबंधी उपक्रम, बियाणे, खते, उपकरणे व त्यांची दुरूस्ती, सर्व वस्तूंची निर्यात व आयात, ई कॉमर्स, पेट्रोल पंप आणि पेट्रोलियम संबंधित उत्पादने, न्यायालय, वकीलांची कार्यालये, आयटी सेवा, सरकारी व खाजगी सुरक्षा सेवा, विद्युत व गॅस पुरवठा सेवा, एटीएम, पोस्टल सेवा, पावसाळ्याच्या हंगामासाठी साहित्याच्या उत्पादनामधील यंत्रणा, अत्यावश्यक सेवेतील वाहनांच्या दुरूस्तीसाठी गॅरेज, स्पेअर पार्ट, पक्चंर दुकाने.
हे राहणार बंद…
अत्यावश्यक सेवेत नसलेली दुकाने व आस्थापना, मॉल, सिनेमा, नाट्यगृह, लॉजिंग, बार सर्व खासगी कार्यालये बंद, सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रम, धार्मिक स्थळे, मेळावे, करमणूक कार्यक्रम प्रतिबंधित क्षेत्रामध्ये कार्यक्रम घेण्यास मनाई व्यायाम शाळा, स्पा, वेलनेस सेंटर