जळगाव : 2014च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना – भाजप युती तुटल्यानेच देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले. युती तोडण्याचानिर्णय आधीच झाला होता, मी केवळ त्यांची घोषणा केली, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसेंनी केला आहे. त्यावेळीयुती तोडली नसती तर मुख्यमंत्री शिवसेनेचा झाला असता, असेही खडसे यांनी सांगितले.
आ. एकनाथ खडसे म्हणाले की, 2014 विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात शिवसेनेचा मुख्यमंत्री झाला असता. मात्र, तेव्हा देवेंद्रफडणवीसांनी युती तोडण्याचा निर्णय घेतला होता. या सर्व प्रकियेत देवेंद्र फडणवीस यांची भूमिका आग्रही होती, असा खळबळजनकदावा एकनाथ खडसेंनी केला आहे. यामुळे शिवसेना विरुद्ध भाजप वाद पुन्हा पेटण्याची शक्यता आहे. देवेंद्र फडणवीस यांनी आमचीनैसर्गिक युती होती, असे जाहीर वक्तव्य मविआ सरकार कोसळताना केले होते. यानंतर आता एकनाथ खडसेंच्या वक्तव्याने राजकीयवातावरण पुन्हा तापणास अशी चिन्हं दिसून येत आहे.
शिवसेना आणि भाजप युतीत ठरल्याप्रमाणे भाजप दिल्ली पाहणार आणि शिवसेना महाराष्ट्र पाहणार, असे बाळासाहेबांनी भाजपलासांगितले होते. त्यातच युती तोडली नसती तर शिवसेनेचा मुख्यमंत्री झाला असता, हे लक्षात आल्यानेच देवेंद्र फडणवीस यांनीशिवसेनेसोबत युती तोडण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आणि स्वत: मुख्यमंत्री झाले, असा गौप्यस्फोट एकनाथ खडसेंनी केला आहे. आता या प्रकरणावरून आज शिवसेना आणि भाजपमध्ये राजकीय वाद वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.