सोन्याच्या दरात घसरण

0

मुंबई : लॉक डाऊन मध्ये सोने प्रचंड महाग झाले होते. मात्र सध्या सोन्याच्या दरात सलग दुसऱ्या दिवशी घट झाली आहे. आठ दिवसांपासून शेअर बाजारासोबतच सोन्यातील गुंतवणूक वाढू लागली होती. त्यामुळे सोन्याचे दर वाढू लागले होते. मात्र, सोन्याच्या दरात चार दिवसांत ५०० रुपयांची तर चांदीतही १००० रुपयांची घसरण झाली आहे.

जागतिक बाजारात सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. भारतीय बाजारपेठेतही सोन्याचे दर घसरले आहे. सोमवारी सोन्याचा दर ५१ हजार १०० रुपये प्रति दहा ग्रॅम होतो त्यात मंगळवारी ५०० रुपयांनी घट होऊन ५० हजार ६०० रुपयांवर आले आहे. कोरोना लशीची चाचणी यशस्वी झाल्याच्या वृत्ताने आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर घसरले आहे. सध्या सोन्याच्या दरात अस्थिरतेचे वातावरण राहण्याचे संकेत आहे.

आठ ऑगस्ट रोजी सोन्याचा दर ५६ हजार ५०० रुपये दहा ग्रॅमवर पोहोचला होता. तर चांदीचा भाव ६८ हजार रुपये किलोग्रॅम इतका झाला होता. सध्या सोने-चांदीच्या दरात घसरण झाली आहे. दरम्यान, कोरोना लशींच्या चाचण्या एकामागून एक यशस्वी होत आहेत. त्यामुळे भांडवली बाजारात तेजीची लाट आली होती.

Leave A Reply

Your email address will not be published.