लखनौ : प्रसिद्ध डान्सर सपना चौधरी सोमवारी कोर्टात हजर झाली असता सपनाला न्यायालयाने ताब्यात घेतले आहे. लखनौला आल्यानंतर सपना चौधरीने कोणालाही कळू दिले नाही.
तसेच ती खोली क्रमांक 204 मध्ये असलेल्या एसीजेएम 5 शंतनु त्यागी यांच्या न्यायालयात हजर झाली. न्यायालयाने जारी केलेले अटक वॉरंट रद्द करण्यासाठी सपना येथे आली होती. 1 मे 2019 रोजी सपना चौधरीवर विश्वासभंग आणि फसवणुकीच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी 20 जानेवारी 2019 रोजी आयोजक जुनैद अहमद, इवाद अली, रत्नाकर उपाध्याय आणि अमित पांडे यांच्या विरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आले होते.
13 ऑक्टोबर 2019 रोजी लखनऊच्या स्मृती उपवनमध्ये दुपारी 3 ते 10 या वेळेत सपनाचा कार्यक्रम होता. कार्यक्रमात प्रवेशासाठी तिकीटांची ऑनलाइन आणि ऑफलाईन प्रति व्यक्ती 300 रुपये दराने विक्री करण्यात आली. हा कार्यक्रम पाहण्यासाठी हजारो लोकांनी तिकिटे खरेदी केली मात्र सपना चौधरी रात्री 10 वाजेपर्यंत आली नाही. कार्यक्रम सुरू न होताच लोकांनी गोंधळ घातला मात्र आयोजकांनी तिकीटधारकांचे पैसे परत केले नाहीत. 14 ऑक्टोबर 2018 रोजी आशियाना पोलिस ठाण्यात या प्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली होती.