सिंदखेड राजा (बुलडाणा ) : समृध्दी महामार्गवर विदर्भ ट्रॅव्हलचा भीषण अपघात झाला. अपघात झाल्यानंतर ट्रॅव्हल्सने पेट घेतल्यामुळेट्रॅव्हल्स मधील 24 प्रवाशाचा होरपळून मृत्यू झाल्यांची प्राथमिक माहिती समोर आली आहे. हा अपघात बुलढाणा येथील सिंदखेड राजायेथील पिंपळखुटा गावालगत समृध्दी महामार्गावर झाला.
विदर्भ ट्रॅव्हल्स क्रमांक एमएच 29 बी ई 1819 ही 30 जून रोजी सायंकाळी 5 30 वाजता नागपूर वरून पुण्याच्या दिशेने जात होती. विदर्भ ट्रॅव्हल्सच्या धावत्या गाडी समोरील टायर अचानक निघाल्याने ट्रॅव्हल्स समृद्धी महामार्गावरील पुलावरील दुभाजकाला धडकूनपलटी झाली.
पलटी झाल्यानंतर ट्रॅव्हल्सने काही मिनिटामध्ये पेट घेतला. त्यानंतर गाडीचा स्पोट होवून संपूर्ण ट्रॅव्हल पुर्णपणे जुळून खाक झाली. याट्रॅव्हल्समधील अंदाजे 24 प्रवाशांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. विदर्भ ट्रॅव्हल्स कारंजा येथे जेवणासाठीथांबली होती. त्यानंतर कारंजा जवळ असलेल्या इंटरचेज वरुन समृद्धी महामार्गावर पुण्याला जाण्यासाठी मार्गस्थ झाली होती.
अपघाताची माहिती मिळताच पोलीस विभागाचे अधिकारी कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले . फायर ब्रिगेडच्या वाहनाने ट्रॅव्हल्सलाविझवण्यात आले. ट्रॅव्हल्स मधील होरपळून मृत्यू झालेल्या प्रवाशांचे मृतदेह बाहेर काढण्याचे काम प्रशासनाकडून सुरू आहे.
या गाडीचे चालक व वाहक सह 5 जण बचवल्याचे समजते, सद्या बचाव कार्य सुरू असून मृत्यू मुखी पडलेल्यांचा आकडा लवकरचसमोर येणार आहे या गाडीत 29 प्रवासी असल्याचे चालकाने सांगितले.