भितीचे वातावरण : कोरोना बाधितांमध्ये कोणतीही लक्षणे आढळत नाहीत

0

मुंबई : राज्यासह मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. मात्र धक्कादायक बाब म्हणजे बाधितांमधील 80 ते 85 टक्के रुग्णांमध्ये कोरोनाची कोणतीही लक्षणेच नसल्याची माहिती पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी आज ही दिली.

मुंबईत गेल्या दोन दिवसांपासून एक हजारापेक्षा जास्त रुग्ण आढळत असल्याने नागरिकांची चिंता वाढली आहे. मुंबईत आज 1145 तर बुधवारी 1167 रुग्ण आढळले असून यामधील 85 टक्के रुग्णांमध्ये कोरोनाची लक्षणे नाहीत. आयुक्तांनी बाधितांमध्ये लक्षणे नसल्याचे स्पष्ट केले असले तरी हेच कोरोनाबाधित कोरोनाचा प्रसार वाढवण्यास कारणीभूत ठरण्याची भिती आहे.

दरम्यान, राज्यात 64 हजार सक्रिय रुग्णांमधील 78 टक्के रुग्ण रुग्णालयांत उपचार घेत आहेत. तर मुंबईत 8997 सक्रिय रुग्ण असून 49 टक्के रुग्ण रुग्णालयात उपचार घेत आहेत. गेल्या आठवडय़ाच्या तुलनेत 78 ते 82 टक्के रुग्णांमध्ये कोणतीही लक्षणे नव्हती. आता मात्र लक्षणे नसलेल्या रुग्णांचे प्रमाण वाढल्याने चिंता वाढली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.