अखेर वनमंत्री संजय राठोड यांनी पाठवला मातोश्री वर राजीनामा

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण

0

मुंबई : बीड येथील तरुणी पूजा चव्हाण हिने पुण्यात आत्महत्या केली. या प्रकरणातील ऑडीओ क्लिप व्हायरल झाल्याने आघाडी सरकारमधील वनमंत्री संजय राठोड यांच्या बदलीची मागणी होऊ लागली. तसेच योग्य तपास करुन, संबंधितांवर कारवाईची मागणी होत होती. यातून मंत्री राठोड यांनी आज त्यांचा राजीनामा मातोश्रीवर पाठवला असल्याचे विश्वासनिय सूत्रांनी सांगितले.

चित्रा वाघ यांनी पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी शिवसेना नेते आणि राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांचं नाव घेऊन गंभीर आरोप केला होता. या प्रकरणी सुरुवातीला दबक्या आवाजात मंत्री राठोड यांच्या नावाची चर्चा होती. मात्र, वाघ यांनी थेट सोशल मीडिया आणि प्रसारमाध्यमांसमोर येऊन संजय राठोड यांचं नाव घेतलं होतं. त्यानंतर या प्रकरणावरुन त्यांना आता धमकीचा फोन आल्याची माहिती समोर आली आहे

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी आज वेगळा खुलासा झाला. पूजाने आत्महत्या केली नाही तर ती चक्कर येऊन पडली, असा जबाब पूजासोबत असलेल्या दोघांनी दिल्याची माहिती मिळत आहे. इतकच नाही तर रुममध्ये वाईनच्या वाटल्याही सापडल्याची माहिती मिळत आहे. वानवडी पोलिसांनी अरुण राठोड आणि विलास चव्हाण यांचा जबाब नोंदवला आहे. या जबाबानुसार आता पूजा चव्हाण प्रकरणाला नवं वळण मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

पूजा चव्हाणच्या आई-वडिलांचा जबाबत पोलिसांनी यापूर्वीच नोंदवला आहे. या घटनेचा उलगडा होण्यापर्यंत तपास सुरु राहणार आहे. पोलीस महासंचालकांनी पुणे पोलीस आयुक्तांना चौकशीचे आदेश दिल्याची माहिती मिळतेय. पण पोलीस मात्र याबाबत अधिकृतपणे बोलत नाहीत. दरम्यान आज उशिरापर्यंत पोलीस महासंचालकांना चौकशी अहवाल सादर केला जाणार असल्याचीही माहिती मिळत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.