पहिला ‘लता दीनानाथ मंगेशकर’ पुरस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रदान

0

मुंबई : लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार आज (रविवारी, दि. 24) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रदान करण्यात आला. मुंबई येथे हा सोहळा पार पडला. पुरस्काराचे यावर्षी हे पहिले वर्ष होते.

Maharashtra | Prime Minister Narendra Modi receives the first Lata Deenanath Mangeshkar Award in Mumbai pic.twitter.com/RpgaAKetnC

— ANI (@ANI) April 24, 2022

लता मंगेशकर यांच्या नावाने दिला जाणारा ‘लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार’ यावर्षीपासून सुरु करण्यात आला आहे. पहिला पुरस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रदान करण्यात आला आहे.

Mumbai | When the award is in the name of an elder sister like Lata Didi, it is a symbol of her oneness and love for me. So, it’s not possible for me not to accept. I dedicate this award to all the countrymen: PM Modi on the first Lata Deenanath Mangeshkar Award pic.twitter.com/H2BZhZJHxn

— ANI (@ANI) April 24, 2022

यावेळी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, “लता दीदींसोबत माझं खूप जुनं नातं आहे. सरस्वतीचं प्रतिरूप म्हणजे लतादीदी. मंगेशकर कुटुंबाचं देशासाठी मोठं योगदान आहे. संगीत हे साधनही आहे भावनाही आहे. सुधीर फडके यांच्यामुळे लतादीदींबरोबर माझी ओळख झाली. लता दीदींचे सूर युवा पिढीसाठी प्रेरणादायी आहेत. संगीताची शक्ती लता दीदींमधून दिसली. लता दीदींच्या गाण्यात राष्ट्रभक्ती आहे.

PM Narendra Modi gets first Lata Deenanath Mangeshkar award; says he is dedicating it to all Indians

— Press Trust of India (@PTI_News) April 24, 2022

“आयेगा आनेवाला” हे पाहिलं गाणं हिट झालं. मला दिलेला हा पुरस्कार मी भारताच्या जनतेला समर्पित करतो, असेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यावेळी म्हणाले.

यावेळी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, ज्येष्ठ गायिका आशा भोसले, मंगेशकर कुटुंबीय याप्रसंगी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.