नवी दिल्ली : फुटबॉलच्या विश्वचषकातील (फिका) स्पर्धेचा अंतिम सामना आज रविवारी रात्री 8.30 वाजता होणार आहे. या सामन्यात गतविजेता फ्रान्स आणि मेस्सीचा संघ अर्जेंटिना भिडणार आहे. विश्वचषकाच्या इतिहासात दोन्ही संघांनी दोनदा हे विजेतेपद पटकावलेले आहे. अर्जेंटिना 36 वर्षांपासून ट्रॉफीची वाट पाहत आहे.
तर 1986 मध्ये दिएगो मॅराडोनाच्या नेतृत्वाखाली संघाने शेवटचा वर्ल्डकप जिंकला होता. त्यानंतर अर्जेंटिनाला ही ट्रॉफी जिंकता आलेली नाही. दुसरीकडे, फ्रान्सने 1998 आणि 2018 मध्ये वर्ल्डकप जिंकला होता. फ्रान्सला सलग दुसऱ्यांदा विश्वचषक जिंकण्याची संधी आहे. लुसैल स्टेडियमवर सायंकाळी 8.30 वाजता सामन्याला सुरूवात होईल. विश्वविजेतेपदाची माळ नेमकी कोणाच्या गळ्यात पडणार हे आज नक्की होणार आहे.