निम्या महाराष्ट्रावर चार दिवस पावसाचं सावट

0

मुंबई :  नैऋत्य मोसमी वारे देशातून परतून एक महिला उलटला तरी महाराष्ट्रासह दक्षिण भारतात पावसाचा जोर कायम आहे. दरवर्षी नोव्हेंबर महिन्यात महाराष्ट्रात पाऊस संपून अल्हाददायक थंडीला सुरुवात होत असते. परंतु यंदाच्या वर्षीचा हिवाळा मात्र याला अपवाद ठरला आहे. राज्यात अजूनही काही ठिकाणी किमान तापमानाचा पारा वाढलेला आहे. तर अरबी समुद्र, बंगालचा उपसागर आणि अंदमान समुद्र परिसरात निर्माण झालेल्या हवेच्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे अनेक ठिकाणी पावसाच्या सरी कोसळत आहेत.

19 जिल्ह्यांना येलो अलर्ट
कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने महाराष्ट्रात पावसाची स्थिती कायम राहणार असल्याची माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली आहे. पुढील चार दिवस राज्यात अनेक ठिकाणी येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. हवामान विभागाने मुंबई, पुणे, ठाणे, पालघर, नंदुरबार, धुळे, नाशिक, अहमदनगर, बीड, लातूर, नांदेड, सोलापूर, उस्मानाबाद, सांगली, सातारा, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या 19 जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट जारी केला आहे.

19 Nov; राज्यात पुढच्या 4 दिवसांत (19-22 Nov) मेघगर्जनेसह पावसाची 🌧🌩शक्यता. वारे पण जोरदार असण्याची शक्यता. कोकण, मध्य महाराष्ट्र तसेच संलग्न मराठवाडा भाग प्रभावित.
3 व 4 दिवशी प्रभाव कमी होण्याची शक्यता. विजा चमकताना बाहेर पडू नका,
– IMD@RMC_Mumbai pic.twitter.com/lgP1sImYr0

— K S Hosalikar (@Hosalikar_KS) November 19, 2021

पुढील तीन ते चार तासात राज्यात 19 जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह वेगवान वाऱ्यांच्या साथीनं जोरदार पावसाची शक्यता आहे. या जिल्ह्यात आज सकाळ पासूनच ढगाळ हवामानाची नोंद करण्यात आली आहे. तसेच आज जळगाव, औरंगाबाद, जालना, परभणी आणि हिंगोली या पाच जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मध्यम ते मुसळधार पावसाच्या  सरी कोसळण्याची शक्यता आहे. दरम्यान आकाशात विजा चमकत असताना नागरिकांनी घराबाहेर पडू नये, असा सल्ला हवामान तज्ज्ञांकडून देण्यात आला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.