जळगाव मध्ये अतिथंडीमुळे गारठून चौघांचा मृत्यू

0

जळगाव : जळगाव शहरात थंडीच्या कडाक्याने सोमवारी रात्री चार जणांचा बळी गेला आहे. हे चौघेही घर नसल्याने रस्त्याच्या कडेला झोपले होते. तापमान रात्री साडेसात अंशापर्यंत घसरले आणि गार वारेही सुटले.

त्यामुळे गारठून त्यांचा मृत्यू झाला असे प्रथमदर्शनी समोर आले आहे. जळगाव शहरात भीक मागून उदरनिर्वाह करणारे हे चौघे वेगवेगळ्या ठिकाणी मृतावस्थेत आढळून आले.

त्यातील एक पांडे डेअरी चौकात, एक निमखेडी रस्त्यावर तर एक रेल्वे स्थानक परिसरात आढळून आला. एकाचा मृतदेह सायंकाळी जिल्हा पेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळून आला.

जिल्हा रुग्णालयात आणल्यावर त्यांना मृत घोषित करण्यात आले. त्यांची ओळख पटलेली नाही. साेमवारी मध्यरात्री दोन वाजेनंतर थंडीचा कडाका प्रचंड वाढला होता.

तापमापकावर ७.५ अंशांची नोंद झाली असली तरी रात्री कामानिमित्त घराबाहेर पडणाऱ्यांनी ही थंडी असह्य होत होती, असे सांगितले.

जमीन थंड आणि अंगावर पुरेसे पांघरूण नसल्यामुळे रस्त्याच्या कडेला उघड्यावर झाेपलेले हे चौघे मरण पावले असावे, असे डाॅक्टरांचे म्हणणे आहे. मात्र, शवविच्छेदनानंतर त्यांच्या मृत्यूचे कारण अधिक स्पष्ट होईल.

Leave A Reply

Your email address will not be published.