मुंबई : देशासह राज्यात कोरोनाने परस्थिती बिकट केली आहे. अनेकांचे पालकत्व हरपले आहे. तर अनेक बालक अनाथ झाले आहेत. अश्यात राज्य शासनाने चांगला निर्णय घेतला आहे.
कोरोनामुळे पालकांचे छत्र हरपलेल्या विद्यार्थ्यांना पदव्युत्तर शिक्षणापर्यंतची संपूर्ण फी माफ करण्यात आल्याची घोषणा उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केली आहे. त्याचप्रमाणे विद्यापीठे आणि अनुदानित महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांना आकारण्यात येणारे इतर शुल्कही पूर्णपणे माफ करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
कोरोनाची लागण झाल्याने अनेक विद्यार्थ्यांनी आपले पालक गमावले. त्यामुळे त्या विद्यार्थ्यांसमोर शिक्षण कसे घ्यावे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. अशा विद्यार्थ्यांना राज्य सरकारने दिलासा दिला आहे.
त्यांच्या पदवी तसेच पदव्युत्तर शिक्षणापर्यंतची संपूर्ण फी माफ करण्यात आल्याचे उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.