यवतमाळ : लॉकडाऊनच्या काळात शहरात चक्क जिम मध्येच जुगार अड्डा सुरु असल्याचे समोर आले आहे. शहर पोलिस ठाण्यातील डिबी पथकाने धाड टाकून १९ जणांना ताब्यात घेतलं आहे. ही कारवाई आरटीओ कार्यालय परिसरात असलेल्या एका जिममध्ये करण्यात आली आहे.
सलीम शहा सुलेमान शहा (५०, रा. अलकबीर नगर), राजेंद्र भिमरावजी गुल्हाणे (४८, रा. सुकळी ता.बाभुळगाव), नरेंद्र रामनाथ यादव (६०, रा. चौसाळारोड बोदड), सलीम शहा गुलाब शहा (४०, रा. सुकळी ता.बाभुळगाव), आरीफ अहेमद सिद्दीक अहेमद (४२, रा.कळंब चौक), आसिफ रहीम खान (६२, रा. कळंब चौक), शेख युनुस शेख अब्दुल (५४, रा. शादाब बाग), शेख एजाज शेख हबीब (३६, रा. अलकबीर नगर), मोहम्मद जावेद शेख अहमद (५०, रा. अलकबीर नगर), बबन चंपतराव भुसारे (५२, रा. हातगाव जि. नांदेड), अमित वसंतराव नागभीडकर (४५, रा. तारपूरा), सुमीत कैलास पेटकर (४२, रा. पाटीपुरा), अब्दुल कयुम खान (४४, रा. कुंभारपुरा), अशफाक खान मजीद खान (४९, रा. कळंब चौक), शेख ईम्रान शेख जाफर (४१, रा. बाबा नगर), गुलाब बाबुराव इंगळे (५५, रा. जय भारत चौक), उमेश लक्ष्मण गुरखे (३५, रा. जुना उमरसरा), अनिल शिवचंद चौहान (५०, रा. आसोला खुर्द ता. मानोरा) आणि झायेद शहाद तगाले (३५, रा. गांधी चौक, यवतमाळ) अशी पोलिसांनी ताब्यात घेतलेल्याची नावे आहेत.
शहरातील आरटीओ कार्यालय परिसरातील एका जिममध्ये मोठ्या प्रमाणात जुगार सुरू होता. याबाबतची माहिती यवतमाळ शहर पोलिस ठाण्यातील डिबी पथकाला मिळाली. त्यावरून बुधवारी सायंकाळच्या सुमारास पथकातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी सापळा रचून त्या जुगार अड्ड्यावर धाड टाकली. यावेळी १९ जुगाऱ्यांना जुगार खेळताना रंगेहात पकडण्यात आलं. या जुगाऱ्यांकडून पोलिसांनी १९ मोबाईल, एक दुचाकी, जुगार साहित्य आणि रोख असा एकूण दोन लाख ४४ हजार ८२० रूपयाचा मुद्देमाल जप्त केला.
या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात सदर १९ जुगाऱ्यांवर विविध कलमान्वये गुन्हे नोंद करण्यात आले आहेत. ही कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ, अपर पोलिस अधीक्षक डॉ. खंडेराव धरणे, उपविभागीय पोलिस अधिकारी माधुरी बावीस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली शहर ठाणेदार प्रदिप शिरस्कर, सहाय्यक पोलिस निरिक्षक रामकृष्ण भाकडे, पथकातील महेश मांगुळकर, अंकुश फेंडर, मिलींद दरेकर, अमित मस्के यांनी पार पाडली.