एअर हॉस्टेसवर सामूहिक बलात्कार; मृत्यू

0

मकाती (फिलिपिन्स) : फिलिपिन्समध्ये 23 वर्षीय हवाई सुंदरीवर नवीन वर्षाची पार्टीत मित्रांनी सामूहिक बलात्कार केला. यामध्ये तिचा मृत्यू झाला असल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी 11 जणांना अटक झाली आहे.

पीडित तरुणी फिलिपिन्स एअरलाइन्समध्ये नोकरीस होती. ती नव्या वर्षाची पार्टी आपल्या मित्रांसोबत साजरी करण्यासाठी मकातीतील एका हॉटेलमध्ये थांबली होती. सकाळी मित्रांनी क्रिस्टीनला मृतावस्थेत पाहिले तेव्हा त्यांना धक्काच बसला. पोलिसांना मृतदेहावर अनेक खुणा दिसल्या त्या सामूहिक बलात्काराची साक्ष देत होत्या.

या घटनेप्रकरणी ११ जणांना अटक झाली. यातील तीन जण हे त्या रात्रीच्या पार्टीत सहभागी होते. ती तिच्या मित्रां सोबत गेली होती म्हणून तिला जायची परवानगी दिली, असे तिच्या आईने पोलिसांना दिलेल्या निवेदनात म्हटले. दुसऱ्या दिवशी तिच्या मृत्यूची बातमी तिच्या आईला समजली.

Leave A Reply

Your email address will not be published.