जेनेलिया म्हणाली, ”…मला लग्न करायचेच होते”

0

मुंबई ः जेनेलिया डिसुझा आणि रितेश देशमुख यांच्या जोडीला प्रेक्षक खूप पसंती दर्शवितात. जेनेलियाने आपल्या करिअरची सुरुवात दाक्षिणात्य चित्रपटांमधून केलेली होती. मात्र, नंतर ती हिंदी बाॅलिवुडमध्ये जास्तच सक्रीय झाली. विवाहानंतर जेनेलियाला सिनेमामंधून बाजूला पडली. मात्र, याची तिला चांगली कल्पना होती.

जेनेलिया आपले कुटुंब व्यवस्थित सांभाळते. जेनेलियाने मुलांना सांभाळण्यासाठी आपले करिअरदेखील बाजूला सारले. अनेक लोकांनी जेनेलियाला सांगितले होते की, लग्नानंतर करिअर संपेल. यासंदर्भात जेनेलियाने स्वतः एका मुलाखतीत खुलासा केला की, “लोकांना कितीही सांगितलं तरी मला लग्न करायचेच होतं.”

जेनेलिया आणि रितेशने एकाचवेळी करिअरची सुरूवात केली होती. ‘तुझे मेरी कसम’ या चित्रपटातून दोघांनी चित्रपटसृष्टीत प्रवेश केला होता. या फिल्मच्या सेटवर दोघे एकत्र आले आणि नंतर १० वर्षे त्यांनी एकमेकांना डेट केले. २०१२ ला दोघांनी लग्न केले. त्यांना रियान आणि राहिल नावाची दोन मुले झाली.

Leave A Reply

Your email address will not be published.