माझ्या हातात ईडी द्या, मी दाखवतो या सगळ्यांना : खासदार उदयनराजे

0

सातारा :  बेधडक आणि रोखठोक विधानांनी नेहमीच सर्वांचं लक्ष वेधून घेणारे खासदार उदयराजेंनी आता थेट  सुत्रंच आपल्या हाती देण्याची मागणी केलीय. “या लोकांनी पैसे खाल्लेच आहेत. माझ्या हातात ईडी द्या, मी दाखवतो या सगळ्यांना. सारखे-सारखे ईडी म्हणजे काय चेष्टा झालीय. पानपट्टीवरील बिडी मिळते ना तशी ईडीची अवस्था झालीय. या सर्वांना ताब्यात घ्या आणि चाप लावा सगळे सरळ होतील. दांडक्याने सडकून काढलं पाहिजेत”, असं रोखठोक विधान उदयनराजेंनी केलं आहे

सध्या राज्यात सुरु असलेल्या आरोप-प्रत्यारोपाच्या राजकीय घडामोडींवर खासदार उदयनराजे यांनी प्रतिक्रिया दिलीय. सध्याचे राजकीय वातावरण कुणी बिघडवले याचा विचार केला पाहिजे, असं त्यांनी म्हटलंय. माझं आवडतं चॅनेल टॉम अँड जेरी आहे. पण, सध्या मी ते बघायचं बंद केलंय आणि ज्या माकड उड्या चालल्या आहेत, त्या बघत बसतोय. कोण कुणाला मारतंय, कोण कुणाला आत टाकतंय हे बघतोय, अशा शब्दात उदयनराजेंनी निशाणा साधला

एका बाजूला फुटपाथवर लोक झोपत आहेत, या लोकांना दिसत नाही का? प्रत्येकाने एकमेकांची पाठ थोपटायची, जेलमध्ये आहे तरी त्याने काही केले नाही. दीड वर्ष, दोन वर्ष जेलमध्ये पण त्याने काही केले नाही म्हणायचे. लोकांना डोळे नाही, लोकांना मेंदू नाही, लोक हसतायत, असं ते म्हणाले. जर निवडणुका लागल्या तर हे कसे उभारणार हे त्यांचे त्यांनाच माहिती, असंही ते म्हणाले. माझं नाव घ्यायचं नाही, मी कुणाच्या नादाला लागत नाही.

Leave A Reply

Your email address will not be published.