गोवा : हरियाणाच्या भाजप नेत्या व टिकटॉक स्टार सोनाली फोगाट यांच्या हत्येप्रकरणी गोवा पोलिसांनी सोनालींचा PA सुधीरसांगवान व त्याचा सहकारी सुखविंदर याच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. सोनालींचे बंधू रिंकू ढाका यांच्या तक्रारीनुसारपोलिसांनी हे पाऊल उचलले. सोनाली मंगळवारी सकाळी गोव्यातील एका हॉटेलात मृतावस्थेत आढळल्या होत्या. त्यानंतर आजगुरूवारी त्यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले.
तत्पूर्वी, सकाळी पीडित कुटुंबीयांनी सोनालींच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यास संमती दिली. 3 डॉक्टरांच्या पथकाने12:45 वाजताशवविच्छेदन सुरू ही प्रक्रिया 4 वाजेपर्यंत चालली. या संपूर्ण प्रक्रियेची व्हिडिओग्राफी करण्यात आली. यावेळी रिंकू ढाका व मेहुणेअमन पुनिया रुग्णालयात उपस्थित होते.
शवविच्छेदनानंतर मृतदेह ताब्यात देण्याची कार्यवाही सुरू आहे. गुरुवारी दुपारी 2 वाजेपर्यंत ते सोनालींचा मृतदेह घेऊन हिसारलापोहोचतील. दरम्यान, सोनाली यांचे दुसरे भाऊ वतन ढाकांनुसार गोवा प्रशासनाने कुटुंबाला निष्पक्ष चौकशीचे आश्वासन दिले आहे.
अमन पुनिया यांनी गोव्यात प्रसारमाध्यमांशी बोलताना सुधीर सांगवान याच्यावर सोनाली यांना रात्री कार्लिस रेस्टॉरंटमध्ये घेऊनगेल्याचा आरोप केला आहे. तेथेच सोनालींची प्रकृती खालावली.
गोवा पोलीस याप्रकरणाचा सध्या तपास करत असून हे राजकीय षडयंत्र असून सुधीर हा त्यातला प्यादा आहे. सोनाली यांनी रात्रीओव्हरडोज घेतला त्यानंतर त्या आजारी पडल्या. मात्र त्या सेलिब्रिटी आहेत म्हणून त्यांना रुग्णालयात नेले नाही असे सुधीर आम्हालासांगतो असे अमन म्हणाले. सोनाली यांच्या भावाने देखीलआरोप केला आहे की, सोनाली यांना ड्रग्जचा ओव्हरडोज देण्यात आला होता.
अमन म्हणाले की, गोव्यातून शवविच्छेदनानंतर दिल्लीतील एम्समध्ये देखील शवविच्छेदन करतील याशिवाय सुधीर 12 तासांपासूनसोनालीचा मोबाइल वापरात असल्याचे देखील त्यांनी सांगितले. गोवा पोलिसांना मोबाइल जप्त का केला नाही असे विचारले असताकोणतेही समाधानकारक उत्तर देण्यात आले नसल्याचे अमन सांगतात.