गोपीचंद पडळकर यांची शरद पवार यांच्यावर टीका

0

मुंबई : पवार नावाची किड या महाराष्ट्राला लागली आहे. ती मुळापासूनच काढून टाकावी लागावी लागेल. तरच तुम्हाला न्याय मिळेल, अशाप्रकारचे वक्तव्य करत भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर जहरी टीका केली आहे.

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची इंदापूरमध्ये जाहीर सभा पार पडली. या सभेत आमदार गोपीचंद पडळकर यांनी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीकास्त्र डागले.

गोपीचंद पडळकर म्हणाले, 2014 मध्ये भाजपचा तरुणाबांड कार्यकर्ता देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाला. आणि 2014 ते 2019 या काळाचा विचार केला तर मराठवाडा, कोकण, खान्देश, विदर्भ असो येथील शेतकऱ्यांचा सारासार विचार करुन शेतकऱ्यांसाठी त्यांनी योग्य ते निर्णय घेतले. मी दुष्काळी तालुक्यातून येतो. तो मतदारसंघ पवारांच्या पाठीशी ठामपमे उभा राहिला. मात्र या दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना शेतीसाठी पाणी द्यावे वाटले नाही. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी हा प्रश्न स्वतःला विचारावा.

गोपीचंद पडळकर म्हणाले, राज्यात आणि देशात अनेक वर्षे यांच्याकडे सत्ता होती. मात्र यांना पाणी देता आले नाही. हे चार वेळा मुख्यमंत्री झाले. यांना का नाही वाटले दुष्काळी भागात पाणी द्यावे? हे केंद्रीय कृषी मंत्री होते. यांना राज्यात पैसा आणावासा वाटला नाही, असा सवाल त्यांनी विचारला.

देवेंद्र फडणवीस एक राज्याचा असा नेता आहे जो निष्लंक आहेत. महाराष्ट्रातल्या जनतेशी त्यांची भागीदारी आहे. त्या देवेंद्र फडणवीसांनी जो अर्थसंकल्प मांडला ज्याने अनेक घटकांना मदत केली. मात्र अजित पवारांनी जो अर्थसंकल्प मांडला प्रस्थापितांना प्रस्थापित करणारा असा अर्थसंकल्प मांडले.

पाकिस्तानमधील तरुण पोरं म्हणतात आम्हाला मोदी सारखा नेता हवाय. आपण भाग्यवान आहोत मोदींच्या सत्तेत राहतोय. तालिबानी मोदींजींबद्दल काय म्हणत आहे पाहा. भावी पंतप्रधान असा काही विषय असतो का? यांच्यांनंतर मायावती, जयललिता, केजरीवाल मुख्यमंत्री झाले. यांना 100च्या पुढे आकडा नेता येत नाही. पुणे जिल्ह्याने राष्ट्रवादीला हद्दपार करायचे ठरवले आहे.

शरद पवार यांना भावी पंतप्रधान करायचे असेल तर तीन वेगळी राज्य करावी लागतील. एक लवासा, एक बारामती, आणि एक मगरपट्टा. मगरपट्टयाचे मुख्यमंत्री जयंत पाटील, लवसाचे मुख्यमंत्री सुप्रिया सुळे आणि बारामतीचे मुख्यमंत्री अजित पवार यांना करा. हे तिन्ही राज्य एकत्र करून देश करा. त्याचा पंतप्रधान शरद पवारांना करा, असा टोला पडळकरांनी लगावला.

Leave A Reply

Your email address will not be published.