‘राज्यपाल महोदयांची जीभ वारंवार घसरते आहे, सुयोग्य व्यक्ती नियुक्त करावा’ : संभाजीराजे

0

मुंबई : मुंबईतून गुजराती आणि राजस्थानी लोक निघून गेल्यास पैसाच उरणार नाही, मुंबई आर्थिक राजधानी राहणार नाही, असे विधान राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केले यामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. त्यांच्या वक्तव्यावर राज्यभरातून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. संभाजीराजे छत्रपती यांनीही राज्यपालांच्या विधानाचा समाचार घेतला.

या संदर्भात संभाजीराजे छत्रपती यांनी या संदर्भात ट्वीट केले. ते आपल्या ट्वीटमध्ये म्हणाले, ”विद्यमान राज्यपाल महोदयांची जीभ वारंवार घसरते आहे. शिवरायांबद्दलचे वक्तव्य असो, महात्मा फुले व सावित्रीबाईंबद्दल पातळी सोडून बोलणे असो अथवा मुंबई बद्दल वक्तव्य करून मराठी माणसाची अस्मिता दुखावणे असो, हे महाशय केवळ राज्यपाल पदाचीच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राची प्रतिमा डागाळत आहेत”

त्यामुळे, देशाच्या राष्ट्रपती महोदया व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तत्काळ या विषयात गांभीर्याने लक्ष घालून महाराष्ट्राच्या ऐतिहासिक व सांस्कृतिक परंपरेचे भान असणारा व त्याबद्दल आदर असणारा एखादा सुयोग्य व्यक्ती महाराष्ट्राचा राज्यपाल म्हणून नियुक्त करावा” असा हल्लाबोल संभाजीराजे यांनी केला.

Leave A Reply

Your email address will not be published.